राहाता येथील सेवानिवृत्त टिचर्स ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने पिंपळवाडी रोडच्या सदाफळ क्लास या शाळेतील सुमारे 50 विद्याथ्र्यांना दोन ताळी जेवणाचे डबे व ते ठेवण्यासाठी कापडी पिशवी भेट देण्यात आली. तसेच सर्जेराव मते, नानासाहेब गाडेकर, नामदेव गाडेकर यांच्यावतीने विद्यालयास 12 खुच्र्या भेट देण्यात आल्या. साहित्य वाटपाचे हे 5वे वर्षे असुन या प्रसंगी सुमारे 15 हजार रुपये किंमतीच्या वस्तू मुलांना व शाळेला भेट देण्यात आल्या.
या प्रसंगी बोलतांना सर्जेराव मते म्हणाले की, टिचर्स ग्रुप दरवर्षी एका शाळेला साहित्य वाटपाची मदत करीत असुन आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो ही यामागे भावना असते. तसेच अशा दानातून इतरांना प्रेरणा मिळावी, त्यांनीही शाळांच्या विकासासाठी योगदान द्यावे या उदात्त हेतूने असा उपक्रम ग्रुपच्या वतीने राबविला जातो. समाजऋणातून उत्तरायी होण्यासाठी ज्ञानमंदीराला दिले जाणारे दान प्रभावी साधन आहे असेही ते म्हणाले.
अॅड. भाऊसाहेब सदाफळ यांनी याप्रसंगी बोलतांना शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडून या शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी समाजासाठी दिले. त्यात नगरसेवक, नगराध्यक्ष, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, वकील, उत्तम शेतकरी, नोकर, सहकारी संस्थांचे संलाचक यांचा समावेश आहे हे त्या व्यक्तींचा नामोल्लेख करुन सांगितले. तसेच या प्रसंगी मनोहर बोरुडे यांनी विद्याथ्र्यांसाठी छान कविता सादर केली तर केंद्र प्रमुख सुनिल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. या अगोदर शाळेच्या लेझिम पथकाने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच विविध रांगोळ्या काढून शाळेचा परिसर सुशोभित केलेला होता. यावेळी विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रुपचे सदस्य व मान्यवरांचे हस्ते सर्व विद्याथ्र्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अरुण मोकळ यांनी केले. या कार्यक्रमास सौ. मोकळ, नगरसेवक प्रविण (गोटू) सदाफळ, नगरसेवक अक्षय बोठे, विश्वस्त सचिन बोठे, नानासाहेब सदाफळ, गणेशचे संचालक संपत हिंगे, नानासाहेब गिधाड हे मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष सर्जेराव मते, नानासाहेब गाडेकर, राजेंद्र लोहाटे, पंढरीनाथ काकडे, नामदेव गाडेकर, भिवसेन गाडेकर, अरुण तुपे, भास्कर झावरे, नारायण गारकर, शिवमुर्ती गोसावी, भास्कर गमे, नानासाहेब मते, मनोहर बोरुडे, मंडलिक शिलेदार, दिलीप वाघ, राजेंद्र बंगाळ, गमे जी.टी., बाळासाहेब निर्मळ, नारायण शिरोळे, प्रा. रामभाऊ गमे, गणेशचे संचालक नानासाहेब नळे, पांडूरंग कटारे या सर्वांनी परिश्रम घेतले.





















