*बीड ब्रेकिंग – शिर्डी आवाज न्यूज*
*धेय्य निश्चित असू द्या, प्रयत्नांना दिशा असू द्या! निपुण बीड अभियानांतर्गत शालेय स्पर्धा परीक्षा – शिक्षक कार्यशाळेचे आयोजन*

*आष्टी/पाटोदा/शिरूर (जि. बीड):* शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड आयोजित निपुण बीड अभियानांतर्गत *शालेय स्पर्धा परीक्षा – शिक्षक कार्यशाळा (आष्टी/पाटोदा/शिरूर मतदारसंघ)* चे आयोजन करण्यात आले आहे.
*तारीख:* शनिवार दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वा.
*स्थळ:* नगर – बीड रोड, मोरेश्वर मंगल कार्यालय, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड
*कार्यक्रमाचे स्वरूप:*
योग्य मार्गदर्शनाच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठू द्या! या घोषवाक्यासह इयत्ता 5 वी, 8 वी शिष्यवृत्ती, NMMS आणि नवोदय परीक्षेच्या दृष्टीने शिक्षकांना दिशादर्शक ठरणारी ही कार्यशाळा आहे.
*उद्घाटक:*
मा. जितिन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड)
*अध्यक्ष:*
मा. आ. सुरेश (अण्णा) धस (आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा सदस्य) – यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम
*प्रमुख अतिथी:*
1) मा. जयश्री चव्हाण – शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. बीड
2) मा. डॉ. किरण कुंवर – शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. बीड
3) मा. प्रियाराणी पाटील – शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. बीड
*मार्गदर्शक:*
– श्रीम. अनिता शरद परदेशी, पुणे (इ. 7 वी. शिष्यवृत्ती / NMMS मार्गदर्शिका)
– श्री. संजय आनंदा शिंदे, कोल्हापूर (इ. 4 थी. शिष्यवृत्ती मार्गदर्शक)
– श्री. विनोद बबनराव झनक, वाशिम (नवोदय परीक्षा मार्गदर्शक)
– श्री. प्रदीप शिवाजी धुमाळ, पुणे (इ. 4 थी. शिष्यवृत्ती मार्गदर्शक)
*आपले विनीत:*
श्री. प्रयाग ढमाळ, श्री. संतोष माने, श्री. भरत नागरे (गटविकास अधिकारी – आष्टी, पाटोदा, शिरूर)
श्री. रवींद्र महामुनी, श्री. सिद्धांत कांबळे, श्री. प्रशांत शिंदे (गटशिक्षणाधिकारी – आष्टी, पाटोदा, शिरूर)
आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघातील सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





















