
*पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ व्या जयंती निमित्त शारदा शैक्षणिक संकुलाची भव्य मिरवणूक :-*
(राहाता वार्ताहर )येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने राहाता शहरातून संकुलातील सर्व विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे पाटील, प्राचार्या शीला संसारे ,मुख्याध्यापक राजकुमार साळवे , प्राचार्या निशा चेंगोट, उपप्राचार्य श्याम जगताप यांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा व सजावट या मिरवणुकीचे आकर्षण ठरले . विद्यार्थ्यांनीनी कलश ,लेझीम, टिपऱ्या पारंपारिक नृत्याच्या तालावर ठेका धरला . या मिरवणुकी दरम्यान ग्रामस्थांनीही पाहण्याचा आनंद घेतला . सुरज लाईट डेकोरेटर यांनी मिरवणूक मार्गावर मोफत पाणी पुरवण्याचा श्रृत्य उपक्रम केला.वीरभद्र मंदीर प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. हुतात्मा चौकात मिरवणूक आल्यानंतर हुतात्मा स्मारकालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. नवनाथ मंदिरा मार्गे पुन्हा मिरवणूक शारदा शैक्षणिक संकुलात आली .
रयत शिक्षण संस्थेमध्ये 22 सप्टेंबर हा दिवस आनंद उत्सव मानला जातो संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यां च्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्याचा उपक्रम केला .ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी पर्यवेक्षक देशमुख, पर्यवेक्षिका कमल साबळे ,सर्जेराव मते,प्रा.शरद गमे, प्रा. रमेश आहेर, प्रा. बाळासाहेब दिघे , प्रा. मोसिन शेख , विवेक गाडेकर किशोर लोहारकर आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून आले.





















