*१४ वर्षांच्या त्रासातून मुक्तता – राहात्यातील साई अभिनव हॉस्पिटलमध्ये जटिल भगंदरावर यशस्वी उपचार; रुग्णाची भावनिक कृतज्ञता*

*राहाता (शिर्डी आवाज न्यूज) -* अहिल्यानगर येथील चंद्रशेखर मधुकरराव झोडगे हे गेल्या १४ ते १५ वर्षांपासून कॉम्प्लेक्स फिस्टुला इन अॅनो (भगंदर) या त्रासदायक आजाराने त्रस्त होते. या काळात त्यांनी अहिल्यानगर, सोलापूर, पुणे, मुंबई येथील नामांकित रुग्णालयांमध्ये लेझर, क्षारसूत्र आणि ओपन फिस्टुलेक्टॉमी अशा ५ ते ६ शस्त्रक्रिया केल्या. तसेच युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी असे सर्व उपचार घेऊनही अपेक्षित आराम मिळाला नाही.
अखेर त्यांच्या मानलेल्या मुलाच्या आग्रहाने ते राहाता येथील *साई अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. किरण गोरे (MBBS, MS, Coloproctologist)* यांच्याकडे आले.
सुरुवातीला ३०० ते ४०० पानांची जुनी फाईल पाहून डॉ. गोरे यांनी सखोल अभ्यास करून उपचार सुरू केले. मुंबई-पुण्यात बरे झाले नाही, मग राहात्यात काय होणार? अशी शंका असलेल्या रुग्णाला *फक्त १५ दिवसातच मोठा फरक जाणवला.*
कुटुंबीयांनी सांगितले की, यापूर्वी जखमेतून होणारा पू पुसण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात कापूस लागायचा, तो त्रास आता जवळपास थांबला आहे. दुखणे कमी झाले, ८ ते ९ किलो वजन वाढले आणि दैनंदिन जीवन सुरळीत झाले.
१४ वर्षांनंतर मिळालेल्या या दिलास्यामुळे रुग्णाने स्वतः हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ. गोरे यांचे आभार मानले. *”Miracles do happen”* अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कुटुंबीय म्हणाले, “मोठ्या शहरांमध्ये मिळणारे ज्ञान ग्रामीण भागातील तज्ज्ञांमध्येही आहे, पण रुग्णाविषयीची आपुलकी आणि वैयक्तिक लक्ष हे साई अभिनव हॉस्पिटलचे वेगळेपण आहे.”

*साई अभिनव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, राहाता*
*डॉ. किरण गोरे – संपर्क: 9405000454 / 9270245254*




















