*शिर्डी | साई मंदिर | भाविक देणगी*
*HEADLINE:*
*शिर्डीतील साई दरबारी अमेरिकेतून आले सोन्याचे दान! श्री साईबाबांच्या चरणी १८.८४ लाखांची सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री अर्पण

*शिर्डी, दि. १५ सप्टेंबर*
*शिर्डी -* शिर्डीचे आराध्य दैवत श्री साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा सातासमुद्रापार असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. श्री गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर अमेरिका स्थित साईभक्त *श्री. के. चंद्रशेखर* यांनी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल *रु. १८ लाख ८४ हजार ८६३* किमतीची अमूल्य भेट अर्पण केली आहे.
अर्पण करण्यात आलेली ही भेट आहे *०८ किलो ९३३ ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री (Silver Umbrella with Gold Plating).*
मिळालेल्या माहितीनुसार, साईभक्त के. चंद्रशेखर हे मूळचे भारतीय असून सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. साईबाबांवरील अपार श्रद्धेपोटी त्यांनी ही विशेष छत्री तयार करून घेतली आणि गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी श्रींच्या चरणी अर्पण केली.
*समाधी मंदिरात प्रतिष्ठापना*
या पवित्र छत्रीची आज श्री साईबाबा समाधी मंदिरात माध्यान्ह आरतीपूर्वी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी साईबाबांच्या मूर्तीवर ही सुवर्णमय छत्री शोभून दिसत होती, आणि भाविकांनी या दानाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी *मा. श्री. गोरक्ष गाडीलकर साहेब* यांनी साईभक्त के. चंद्रशेखर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला आणि संस्थानच्या वतीने त्यांचे आभार मानले.
साई संस्थानकडे येणाऱ्या अशा देणग्यांमुळे भाविकांचा साईवरील विश्वास अधिकच दृढ होत असल्याचे यावेळी बोलले जात आहे.
*- Shirdi Awaz News | प्रतिनिधी, शिर्डी*




















