15 चारी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाल दिंंडीचे जि.प.शाळेचे आयोजन

( राहाता ) वै..सजन यशवंत सदाफळ वै.भाऊसाहेब सजन सदाफळ यांचे स्मरणार्थ बांधण्यात आलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 15 चारी वतीने मोठया भक्तिमय वातावरणात आषाढी वारी निमित्त बाल दिडींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अडव्होकेट रामनाथ सदाफळ पाटील कैलास सदाफळ पाटील यांचेकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी विधिज्ञ रामनाथ सदाफळ म्हणाले की बालपणीच मुलांवर अध्यात्मिक संस्कार झाले तर त्यातुन सुसंस्कारित गाव,राज्य,आणि बलशाली प्रगतीशील भारत घडविण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.संंस्कारीत पिढी घडल्यास समाजातील अत्याचार, व्यभिचार गुन्हेगारी कमी होईल. शाळेेचे मुख्याध्यापक वडणे सर शाळेत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करीत असल्याने विविध उपक्रम राबवीत असल्याने त्यांचे ही कार्याचे कौतुक केले.यावेळी शाळेतील जानका गोरडे मॅडम,बाजीराव बनसोडे सर सर,शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी चालिवर भक्ती गीत सादर केले.यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष सचीन आरणे,देवचंद आरणे,संदीप आरणे महीला भगिणी सह मुख्याध्यापक मच्छिंद्र वडने,सुरेश भिंगारदिवे,अमोल तुम्हारे,संदीप धिवर,बालाजी ऐंदवाड,अमोल पाळंदे,सुवर्णा सदाफळ, दिपाली सदाफळ आदि उपस्थित होते.स्वामी सदाफळ, मनोज सदाफळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.




















