साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी येथील अद्वितीय शस्त्रक्रिया
⸻
“डोक्यावर गाठीचा डोंगर!” — जन्मजात ४.९ किलो वजनाची गाठ हटवून २१ वर्षा वयाच्या तरुणाला दिला नवा जीवनश्वास
शिर्डी | २१ वर्षीय तरुणाच्या कपाळावर जन्मापासून असलेली 30*25 से.मी. आकाराची भलीमोठी गाठ हटवण्यात आली असून, ही गाठ तब्बल ४.९ किलो वजनाची होती. ही जटिल शस्त्रक्रिया डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ
डॉ निहार जोशी त्यांच्या सर्जरी विभागाच्या टीमने साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी येथे यशस्वीपणे पार पाडली.
गाठ इतकी मोठी होती की ती दूरूनही सहज दिसत होती व रुग्णाच्या सामाजिक,मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होती.अनेक वर्षांपासून या गाठीसह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून डॉक्टरांनी त्वरीत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ अजिंक्य पानगव्हाणे शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्ये सांगताने म्हणाले की गाठ जन्मजात असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दुर्मिळ बाब आहे. संपूर्ण गाठ एकाच वेळेस व पूर्णपणे काढण्यात आली.गाठीचे वजन ४.९ किलो नोंदवले गेले.जे सामान्य गाठींपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे.रुग्ण आता पूर्णपणे स्थिर असून त्याची प्रकृती सुधारत आहे.डॉ.अजिंक्य पानगव्हाणे यांनी सांगितले की ही शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक होती.पण आमच्या टीमच्या अनुभवामुळे आणि नियोजनामुळे ती अत्यंत यशस्वी ठरली.यामधे मेल सर्जरी वॉर्ड चा महत्वाचा वाटा होता .शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल हे केवळ श्रद्धेचे नव्हे, तर आरोग्य सेवेतही ‘चमत्कार’ घडवणारे केंद्र ठरत आहे.
साईबाबा विश्वस्त व्यवस्था समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,उपमुख्याधिकारी भीमराज दराडे,रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट जनरल डॉ शैलेंद्र ओक,उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे, न्यूरो सर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे आदींनी डॉ अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.




















