श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या दीपावली निमित्त शिधा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ युवानेते डॉ सुजय विखे पाटील,श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करत श्री साईबाबांची आरती करण्यात आली तसेच डॉ सुजय विखे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचा सत्कार व्हा चेअरमन पोपटराव कोते यांच्या हस्ते करण्यात आला तसेच इतर सर्व मान्यवरांचा संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार यांनी संस्थेचा वाढता आलेख मांडत श्री साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल ना राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांचे आभार मानले तर पुढच्या दीपावलीला ह्या कायम झालेल्या ४८८ सभासदांना देखील डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शिधा वाटप करण्याची संधी श्री साईबाबांच्या आशीर्वादाने नक्कीच प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला
यावेळी सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात पन्नास किलो साखर,१५ लिटर तेल आणि दोन किलो मिठाई दीपावली भेट म्हणून वाटप करण्यात आली
तसेच डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील विविध विषयांवर नेहमीप्रमाणे परखड मत व्यक्त करत ४८८ कामगारांचा गेल्या २० वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागत असून ह्या सर्व प्रक्रियेचे कोणी श्रेय घेण्यापेक्षा श्री साईबाबांच्या आशीर्वादाने हा विषय मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली
याप्रसंगी डॉ सुजय विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर,नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात,प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, साई निर्माणचे विजयराव कोते,उद्योजक भाऊसाहेब चौधरी, संस्थानचे सर्व अधिकारी ,शिर्डी नगरपरिषदेच्या सर्व सन्माननीय नगरसेविका व नगरसेवक ,सोसायटीचे संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते





















