*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची राहाता तालुक्यात नियुक्ती*

*शिवसेना ठाकरे पक्षाची राहाता शहर संघटकपदी अनिकेत तुपे यांची नियुक्ती – संघटना बळकट करण्याचे आदेश*
*राहाता:*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख *उद्धव ठाकरे* यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते खासदार *संजय राऊत*, संपर्क प्रमुख आमदार *सुनील शिंदे* व जिल्हाप्रमुख *सचिन कोते* यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते *मा. अनिकेत शशिकांत तुपे* यांची *राहाता शहर संघटक* पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्ष कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.




















