शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सुमारे 1 कोटी 16 लाख रुपये खर्चाच्या व 1 हजार मेट्रिक टन धान्य साठवण क्षमतेच्या नवीन गोदाम बांधकामांचा पायाभरणी सोहळा आज सोमवार दि.4 जुलै रोजी शिर्डी येथे संपन्न होत आहे या पायाभरणी सोहळ्यास मोठ्या संख्येने शेतकरी, सभासद बांधव व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ बापू उर्फ विजय भाऊसाहेब गोंदकर यांनी केले आहे
केंद्रशासन व राज्य शासनाचे सहकार से समृद्धी या नावीन्यपूर्ण अभियानातील जगातील सर्वात मोठे धान्य साठवणूक योजनेअंतर्गत तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीव संकल्पनेतून शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी 16 लाख रुपये खर्चाचे 1 हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमता असणाऱ्या नवीन गोदाम बांधकामाचे पायाभरणीचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी स्थळी आज सोमवार दि 4 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खा. डॉ सुजयदादा विखे पाटील भूषविणार आहेत कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आ. शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील सहकार आयुक्त दीपक तावरे विभागीय सहनिबंधक संभाजी निकम जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे प्रकल्प व्यवस्थापक तपसकुमार रॉय , किशोर महाले आदी मान्यवर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत धान्य साठवणूक योजनेअंतर्गत आपला देश अन्य धान्य साठवणुकीत स्वयंपूर्ण व जागतिक महासत्ता बनविण्याचे महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे एक हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या या गोदामाचे उभारणीनंतर शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद बांधवांना आपला शेतमाल साठवणुकी करिता व सुरक्षित ठेवणेसाठी या अत्याधुनिक व सुसज्ज गोदामाचा महत्त्वपूर्ण फायदा होणार आहे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीतून हा प्रकल्प उभारला जात सुसज्ज व अत्याधुनिक असणारे नवीन गोदाम राज्यात एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे संस्थेचे सभासद तसेच परिसरातील शेतकरी यांच्या दृष्टीने हे गोदाम धान्य साठवणुकीसाठी सुरक्षित अनमोल व महत्त्वाचा पर्याय ठरणार या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी सभासद व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन गोपीनाथ बापू उर्फ विजय भाऊसाहेब गोंदकर तसेच सर्व संचालक व संस्थेचे सचिव यांनी केले आहे




















