शारदा शैक्षणिक संकुलात विविध उपक्रमाने भारतीय संविधान दिन साजरा
26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले त्यामध्ये संविधानावर आधारित गीत गायन संविधान अभंग, पथनाट्य सादर करण्यात आले त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी संविधानाबद्दल आपापले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये कुमारी सदफ सय्यद,कु.प्राची रणधीर व शारदा कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी ओवी कुदळे हिने संविधान माझा प्राण हे अभंग गायन केले त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांकडून संविधान श्री रमेश आहेर यांनी म्हणून घेतले त्यानंतर विद्यालयाची प्रभात फेरी घेण्यात आली व संविधानाबद्दल जागृतता करण्यात आली घोषणा देण्यात आल्या
अमृत महोत्सवी संविधान दिनाच्या निमित्ताने शारदा ज्युनिअर कॉलेजचे मराठी विषयाचे अभ्यासक व प्रभावी वक्ते प्रा. हनुमंत माने यांनी विद्यार्थ्यांसमोर अत्यंत अभ्यासपूर्ण, आशयघन आणि प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनाची आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या अपूर्व योगदानाची उज्ज्वल आठवण करून केली. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना आदरांजली अर्पण करत विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आत्मसात करण्याचा संदेश दिला.

प्रा. माने यांनी संविधान दिनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, भारतीय लोकशाही ही संविधानावर आधारित खरी लोकशाही आहे. या महान दस्तऐवजामुळे प्रत्येक भारतीयाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळतो.
आपल्या मनोगतात त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या संविधानिक मूल्यांवर विशेष भर दिला. ही मूल्ये केवळ शब्द नसून राष्ट्राच्या पायाभूत भिंती आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा होत असल्याचा त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला. आणि विद्यार्थ्यांनीही या मूल्यांचे संवर्धन करून आदर्श नागरिक बनावे. असे आवाहन केले.
अशा प्रकारे प्रा. हनुमंत माने यांनी संविधानाच्या गौरवशाली परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागवणारे प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि प्रेरक विचार मांडले. संविधानाबद्दल व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सरकारी वकील एडवोकेट गौरव बोर्डे यांनीही संविधानाबद्दल जागृतता करण्याविषयी विविध नियम व कायदा बद्दल माहिती दिली सदर कार्यक्रम यशस्वी संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे प्राचार्य श्री अनिल बनसोडे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गुंजाळ मॅडम त्याचबरोबर उप प्राचार्य अशोक बोरसे सर श्री संजय जाधव सर किशोर जाधव सर श्रीमती जगधने मॅडम तसेच सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्रीमती अर्चना थोरात व सर्व विद्यार्थिनी व उपशिक्षक सहकारी यांनी यामध्ये सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावी अ च्या वर्गाने केले आभार श्री जाधव सर यांनी मांडले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला



















