Homeताज्या बातम्यावक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो——डॉ पी.जी.गुंजाळ

वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो——डॉ पी.जी.गुंजाळ

*वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो*- *डॉ. पी.जी. गुंजाळ*
शारदा शैक्षणिक संकुलात थोर स्वातंत्र्य सेनानी का.ल. शिंदे पाटील स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन –
(राहाता वार्ताहर) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉ. पी.जी. गुंजाळ अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये का.ल. शिंदे पाटलांमुळे मला या शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. भाऊ विषयी आमच्या सर्वांच्या मनात आपुलकी प्रेम जिव्हाळा होता .त्यांचे काम मोठे होते असे सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. यश अपयश याकडे लक्ष देऊ नये .यश आले तर हुरळून जाऊ नका. अपयशाने नाराज होऊ नका असा संदेश आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिला .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी केले . थोर स्वातंत्र्य सेनानी का.ल. शिंदे पाटील यांच्या कार्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी माजी प्राचार्य नानासाहेब मते जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांनी आपल्या मनोगतातून कै.का.ल शिंदे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटलांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य आम्ही समजतो .त्यांनी शाळा सुरू करून जणू राहाता परिसराला एक शिक्षणाची नवीन संधी उपलब्ध करून दिली असे सांगितले .
जेष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी आपल्या मनोगतातून भाऊं बरोबरच्या आठवणी सांगताना भाऊंचा स्वभाव ,त्यांच्याबरोबर आलेले अनुभव त्यांनी व्यक्त केले . आपल्या मनोगतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .अशा स्पर्धेतूनच उत्तम वक्ता निर्माण होतो असे सांगितले .
शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगत असताना अनेक कार्यकर्त्यांनी का.ल. शिंदे पाटलांना मदत केल्यामुळे इतके मोठे काम पाटील करू शकले असे सांगितले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचे स्किल दाखवावे. यश अपयशाला महत्त्व देऊ नये. यातूनच आपले आयुष्य घडते. चांगले शिक्षण ,चांगले ध्येय ,चांगले विचार ठेवले पाहिजे. यश निश्चित आपणाला मिळते असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. या स्पर्धेमध्ये विविध शाखेतून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी परीक्षा म्हणून श्री शेजुळ, प्रा.शशिकांत बनकर, ज्ञानदेव गमे ,श्री उकिरडे यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रम प्रसंगी माजी प्राचार्य सर्जेराव मते कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुंजाळ ,उप प्राचार्य अशोक बोरसे ,प्राचार्य निशा चंगोट , दिलीप खरात,संदीप वाव्हळ,सचिन बनसोडे, अजय जाधव, राजू पठाण, ज्ञानेश्वर जोरे, रामनाथ सदाफळ, प्रा.शरद गमे प्रा.रमेश आहेर,प्रा. आसिर पठाण,प्रा पंकज दिघे, प्रा. बाळासाहेब दिघे, राजकुमार साळवे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनाली थोरात यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोबेल पारितोषिक विजेते चिलीचे कवी पाब्लो नेरुदा यांचे आजचे कोट: “आपण ज्यांच्यावर प्रेम करतो...

पाब्लो नेरुदा (प्रतिमा: विकिपीडिया) काही अवतरण कल्पना स्पष्ट करतात. इतर लोक फक्त एका भावनेचे वर्णन करतात जे बहुतेक लोकांनी कधीतरी अनुभवले आहे परंतु...

विरोधाला न जुमानता पीएमसी स्थायी समितीने निवडक नागरी शाळा खाजगी संस्थेद्वारे चालविण्यास मान्यता दिली...

16 जून रोजी पीएमसी स्थायी समितीची बैठक झाली पुणे : भाजपच्या नेतृत्वाखालील पीएमसी स्थायी समितीने मंगळवारी इतर राजकीय पक्षांच्या विरोधाला न जुमानता निवडक...

फ्रान्स वि सेनेगल, FIFA विश्वचषक 2026 लाइव्ह स्कोअर: Kylian Mbappé आणि Sadio Mané 24...

फ्रान्सने FIFA विश्वचषक 2026 मधील सेनेगल विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी एक मजबूत आणि आक्रमक प्रारंभिक इलेव्हन नाव दिले आहे, अंतिम तिसर्यामध्ये वेग, सर्जनशीलता आणि तांत्रिक...

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ अपघाती स्फोटात जेसीओ, 3 सैनिक जखमी. भारत...

प्रतिनिधी प्रतिमा (IANS) जम्मू: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालत असताना झालेल्या अपघाती भूसुरुंगाच्या स्फोटात एक कनिष्ठ आयुक्त अधिकारी...

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

error: Content is protected !!