राहाता नगरपरिषदेत माजी सैनिक भानुदास गाडेकर स्वच्छता दूत म्हणून निवड
राहाता : शहरातील समाजसेवक तथा माजी सैनिक भानुदास गाडेकर यांची राहाता नगरपरिषदेने स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले.मुख्याधिकारी लोंढे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की,गाडेकर हे राहाता शहरात निरपेक्ष व निस्वार्थ भावनेने विविध सामाजिक कार्य करीत असून, स्वच्छतेबाबत त्यांनी केलेले जनजागृती कार्य उल्लेखनीय आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकणे,
प्लास्टिक बंदी, अतिक्रमण, उघड्यावर थुंकणे आदी समस्यांवर जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या सहकार्याची अपेक्षा नगरपरिषदेने केली आहे. स्वच्छता दूत म्हणून नियुक्तीनंतर गाडेकर यांनी सांगितले स्वच्छ, सुंदर व हरित राहाता शहर निर्मितीसाठी माझा आणि व्यक्त
माझ्या सहकाऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. गोदावरी कालवा, कात नदी परिसर, रस्ते दुभाजक, मायंबा मंदिर परिसर आदी ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत. लोकसहभागातून प्लास्टिक बॅरल्स ठेवून कचरा संकलन, वृक्ष लागवड आणि संवर्धनास प्रोत्साहन दिले आहे. या निवडीमुळे आमची जबाबदारी अधिक वाढली असून, जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. गाडेकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे तसेच शासनाचे आभार मानले.




















