
आज दिनांक 04/09/2025 रोजी 16/30 वा. ते 17/30 वा. चे दरम्यान गणेशोत्सव व ईद-ए मिलाद च्या अनुषंगाने राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ,पुणतांबा येथे गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच पुणतांबा गावातून रूट मार्च घेण्यात आला आहे. त्या नंतर आठ च्या दरम्यान राहाता पोलीस स्टेशन हद्दीतील राहता शहरात , चितळी चौक , गळवंती मार्गे ,आंबेडकर नगर, हुतात्मा चौक असा मार्च घेण्यात आला आहे. रूट मार्च करिता पो स्टे चे नितीन चव्हाण पोलिस निरीक्षक,पोहेकॉ / कोरेकर ,पोहेकॉ / गडाख ,गोपनिय कर्मचारी पोना / विनोद गंभीरे ,पो.कॉ/ वाघ ,इतर अधिकारी व पोलीस अंमलदार, होमगार्ड व आर.सी.पी चे अंमलदार हजर होते.




















