Homeताज्या बातम्या*मंत्री म्हणून लोकांची जबाबदारी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्वीकारावी लागते!* *ना. राधाकृष्ण विखे...

*मंत्री म्हणून लोकांची जबाबदारी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्वीकारावी लागते!* *ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या सामाजिक बांधिलकीच्या भावना*

*मंत्री म्हणून लोकांची जबाबदारी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्वीकारावी लागते!*

*ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या सामाजिक बांधिलकीच्या भावना*

शिर्डी , दि.६ प्रतिनिधी :

सार्वजनिक जीवनात काम करताना केवळ पद, अधिकार आणि राजकीय जबाबदारी यापुरता विचार करून चालत नाही. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य माणसांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे महत्त्वाचे असते. मंत्री म्हणून काम करतांना एखाद्या कुटूंबाप्रमाणे लोकांची जबाबदारी स्विकारून काम करावे लागते. दुष्काळाच्या संकटाच्या काळात मनावर दबाव ठेवून पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

शिर्डी मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना मंत्री विखे पाटील यांनी राज्यातील दुष्काळाच्या दाहकतेवर भाष्य करून सरकार आणि जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून सध्या कराव्या लागत असलेल्या निर्णयावर भाष्य केले.

राज्यात दुष्काळाची दाहकता खूप मोठी आहे.सांगली सातारा कोल्हापूर भागात यंदा पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.मराठवाड्यात याची दाहकता आणखी वेगळी आहे.सर्व जिल्ह्यांमध्ये जावून पाण्याचे नियोजन करून दिले.निसर्गाने थोडी साथ दिल्यामुळे आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे.पण पाण्याचे निर्णय करताना धरणातील पाणी साठा,त्या भागातील गरजा, शेतीच्या पाण्याचे नियोजन करताना प्रचंड दबाव असतो कारण नियोजनात कोणतीही चूक होवू नये,एखादी गंभीर चूक झालीच तर परिणाम किती भोगावे लागतील असा विचार करून काम करावे लागत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

मंत्री विखे पाटील म्हणाले की,लोकांना फक्त आम्ही गाड्यांमध्ये फिरताना दिसतो.पण सार्वजनिक जीवनात काम करताना एखाद्या कुटूंबाप्रमाणे जबाबदारी घ्यावी लागते.
राजकारणात अनेक पदे आणि जबाबदाऱ्या मिळतात; मात्र या पदांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविता आला पाहिजे. लोक आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने येतात. त्यांच्या प्रश्नांकडे कुटूंबातील अडचणीप्रमाणे आपण पाहातो.शिर्डीची विकासात्मक वाटचाल करताना अनेक चांगले वाईट प्रसंग आले.पण यामध्ये आपल्या मनाला कधी स्वार्थ शिवाला नाही.

सामान्य माणसाचा विश्वास संपादन करणे ही मोठी जबाबदारी आहे. लोकांच्या प्रश्नांना वेळ देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य तिथे तातडीने मदत करण्याची भूमिका आजपर्यत बजावली म्हणूनच या भागातील लोकांनी सलग आठवेळा त्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Psychology says people who enjoy being alone often share these traits: Why they value...

Being alone on a Friday evening does not always mean someone has no plans, friends or social life. For some people, it...

Cybercrooks change Pune shop’s landline number online, cheat customers by taking advance payments for...

Pune: Cybercrooks replaced the landline number of a city-based sweet store with their own cellphone number on its online profile and cheated...

Vaishnavi Adkar, Rutuja Bhosale create tennis history, become first Indian women’s pair to reach...

India's Vaishnavi Adkar and Rutuja Bhosale (PTI Photo/R Senthilkumar) India's Vaishnavi Adkar and Rutuja Bhosale scripted history at the Chennai Open on Saturday,...

US military looks to curb Iranian land commerce

After a months-long naval blockade on Iran, the US military is setting up a task force to bolster Washington's efforts to restrict...

Didn’t buy anything on Dhanteras? You can gold, silver or diamonds on Diwali –...

Intricate gold and silver jewelry, marigold petals, and diyas adorn crimson velvet, evoking a luxurious Diwali celebration. As the festive lights of Dhanteras...

error: Content is protected !!