
राहाता शहरातील डॉ श्री किरण रामकृष्ण गोरे व त्यांचे लोकरुची नगर स्थित साई अभिनव मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल हे मूळव्याध आजाराने त्रस्त रुग्णांसाठी एक वरदान ठरलेले आहे. राहाता तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, आपला भारत देश व विदेशातूनही डॉ किरण गोरे यांच्या कडे मूळव्याध, फिशर, भगनदर, मुतखडा,पोटाचे आजार असे अनेक प्रकारचे रुग्ण आप आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी येतात.या सर्व आजारांच्या उपचारासाठी डॉ किरण गोरे सुप्रसिद्ध आहेत. परंतु आता गोष्ट आहे त्यांनी केलेल्या आगळ्या वेगळ्या मदतीची. डॉक्टरां बद्दल माहिती समजल्यावर सेलू परभणी येथून मूळव्याध चा त्रास असलेला मंदिरात झाडू काम करणारा एक परिस्थितीने गरीब असलेला रुग्ण राहाता येथील डॉ किरण गोरे यांच्या साई अभिनव मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आपल्या मुला बरोबर आला. भयंकर वेदना व रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी लेसरं ओप्रेशन चा सल्ला दिला होता. परंतु पैसे नसल्याने ते दोघे बाप लेक परत घरी जाण्यासाठी निघाले होते. जाण्यासाठी निघण्या अगोदर त्यांनी डॉक्टरांना आपली हकीकत सांगितली की महिन्याचा पगार 7 ते 8 हजार असून त्यात 3 मुली, एक मुलगा यासंह संसार व शिक्षणाचा खर्च करावा लागतो. दमडीही मागे शिल्लक राहत नाही. त्यातच मुलगा हुशार असल्याने तो परभणीत UPSC चा अभ्यास करत आहे. हे ऐकून डॉक्टरांना खूप आनंद झाला. कारण की त्यांना ही UPSC करण्याची इच्छा राहून गेली होती. मुलाचा व परिवाराचा संघर्ष बघून त्यांना आनंद वाटला. त्यांनी त्याला चांगला अभ्यास करून अधिकारी होण्याचा सल्ला दिला. लगेच त्यांचे ओप्रेशन अत्यल्प खर्चात करून दिले. चहा नाश्ता जेवण यांची सोय करून मुक्कामी ठेवले. आज सुट्टी झाल्यावर ते दोघे जाण्या अगोदर डॉक्टरांना भेटायला येऊन डॉक्टरांचे आभार मानून त्यांच्या बरोबर फोटो ही काढला.डॉ किरण गोरे यांनी चांगला अभ्यास करून UPSC पास झाल्यावर कळवण्यास सांगून आर्थिक मदत लागल्यास फोन करण्यास सांगितले. त्या नंतर ते परभणीस रवाना झाले परंतु शहरात डॉक्टरांनी केलेल्या या आगळ्या वेगळ्या मदतीची चर्चा सुरु आहे.




















