Homeताज्या बातम्याकालिका प्रतिष्ठानचा वक्तृत्व व निबंध स्पर्धा कार्यक्रम संपन्न.-राजेंद्र जेजुरकर (अध्यक्ष)

कालिका प्रतिष्ठानचा वक्तृत्व व निबंध स्पर्धा कार्यक्रम संपन्न.-राजेंद्र जेजुरकर (अध्यक्ष)

कालिका प्रतिष्ठानचा वक्तृत्व व निबंध स्पर्धा कार्यक्रम संपन्न.
सामाजिक कार्यक्रम – पाणी वाचवा जीवन वाचवा…
राहाता – राहाता शहरातील धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्यक्रमांसाठी नेहमी अग्रेसर असणारे कालिका प्रतिष्ठान ने यावर्षी पाणी वाचवा..जीवन वाचवा…हा सामाजिक उपक्रम राबवला.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे महत्व काय आहे यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी अशा दोन गटांमध्ये वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे पाणी वाचवा जीवन वाचवा हा विषय घेण्यात आला.

आपल्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर जागरूकता निर्माण व्हावी या करिता कालिका प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या स्पर्धेकरिता अमित मोटर्सचे श्री. अमित शेठ पिपाडा, व माळवदे बिल्डकॉनचे इंजि.साईकुमार माळवदे साहेब हे प्रायोजक होते.

निबंध स्पर्धेमध्ये पहिली ते चौथी गटामध्ये अनुक्रमे प्रथम- सोनम निलेश बोऱ्हाडे (राहाता मुले), द्वितीय- तेजस्विनी गणेश आरणे (राहाता मुले), तृतीय- शिफा फिरोज शेख (सदाफळ क्लास) यांनी व पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम- देविका नामदेव पगारे (15 चारी क्लास) द्वितीय- समर्थ बाळकृष्ण कुमावत, तृतीय-कार्तिकी गणेश आरणे (राहाता मुले) या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिली ते चौथी गटामध्ये अनुक्रमे प्रथम- आरोही कमलेश गावित (मायंबा क्लास), द्वितीय- अमन आसिफ सय्यद (सदाफळ क्लास), तृतीय- अनुष्का अमोल गाडेकर (मायंबा क्लास) यांनी व पाचवी ते सातवी गटामध्ये प्रथम- राहत शफिक सय्यद (15 चारी क्लास) द्वितीय- उपासना बाळकृष्ण कुमावत (राहाता मुले), तृतीय-सोनम सावनकुमार ठाकूर (राहाता मुले) या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला. या सर्वांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. राहता शहरातील सर्व जि.प.प्राथ. शाळेतील 41 विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सहभाग घेतला. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी माळवदे बिल्डकॉनचे साईकुमार माळवदे यांनी आपल्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थी खूप प्रतिभावान आहेत व त्यांना असे व्यासपीठ नेहमी उपलब्ध झाले तर हेच विद्यार्थी पुढे देशाचे भविष्य बनून आपले योगदान देणार आहेत असे सांगितले. सौ. श्वेता अमितशेठ पिपाडा या म्हटल्या की आज या कार्यक्रमासाठी आम्ही जरी अतिथी म्हणून असलो तरी आज या ठिकाणाहून विद्यार्थ्यांकडून आम्ही पाणी वाचवा…. जीवन वाचवा यासाठी त्यांनी मांडलेले विषयातून स्वतः सुद्धा खूप काही शिकून जात आहोत आणि त्याचा आम्ही आमच्या जीवनात आजपासूनच अवलंब करणार आहोत अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विवेक गिरी सर यांनी मनोगत व्यक्त करताना स्पर्धेचे समन्वयक कालिका प्रतिष्ठान चे सर्व सदस्यांचे आभार व्यक्त आपण हे व्यासपीठ छोट्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले असे म्हटले. यावेळी केंद्रप्रमुख सुनील गायकवाड, मुख्याध्यापक पंकज दर्शने, अरुण मोकळ, मच्छिंद्र वडणे, अर्चना साळुंके व सर्व शिक्षक उपस्थित होते. पी.जे.एस. स्कूलच्या कालिंदी कदम, धनश्री गायकवाड मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम बघितले.

कालिका प्रतिष्ठानच्या वतीने राजेंद्र जेजुरकर यांनी म्हटले की आमचे भक्त परिवाराचे उपाध्यक्ष विजय गाडेकर, ज्येष्ठ सदस्य राजेंद्र शिवरकर यांच्या मार्गदर्शनामुळे व सर्व प्रायोजक यांनी दिलेल्या योगदानामुळेच हे सर्व कार्यक्रम संपन्न होतात असे सांगत सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Opposition targets Pune mayor over ‘not a contractor’ remark

Pune mayor Manjusha Nagpure Pune: The Yerawada tragedy has snowballed into a political controversy, with opposition parties attacking Pune mayor Manjusha Nagpure over...

India’s medal storm! 24 medals, five golds as Nishad Kumar, Deepthi Jeevanji shine at...

Nishad Kumar and Deepthi Jeevanji (PTI Photo) NEW DELHI: India produced a stunning medal rush on Day 2 of the Asian Para Games...

‘Doing a real disservice’: Annamalai backs CJP leaders, questions their continued custody

NEW DELHI: Former Tamil Nadu BJP president K Annamalai on Tuesday expressed Cockroach Janata Party and questioned Delhi Police's handling of the...

पद मोठं, जबाबदारी मोठी; पण माणसांशी जोडलेली नाळ आजही घट्ट! सौ मेघनाताई संदीप दंडवते...

*राहाता :* साकुरीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ मेघनाताई दंडवते - पद मोठं, पण नाळ आजही जनतेशी घट्ट! *साकुरी (प्रतिनिधी - राजुभाई पठाण) -* पद...

Merchants to Moguls by Sarojesh Mukerjee: The forgotten business pioneers who shaped Bengal’s economic...

Bengal is often remembered for its poets, writers, reformers and artists. But what about the people who built businesses, established industries and...

error: Content is protected !!