Homeक्राईमएकरूख्याच्या युवकाच्या संसाराची स्वप्ने उद्ध्वस्त होण्यापूर्वीच राहाता पोलिसांनी संपूर्ण कटाचा केला पर्दाफाश

एकरूख्याच्या युवकाच्या संसाराची स्वप्ने उद्ध्वस्त होण्यापूर्वीच राहाता पोलिसांनी संपूर्ण कटाचा केला पर्दाफाश

लग्नाच्या मांडवात जुळलेले नाते काही दिवसांतच फसवणुकीच्या जाळ्यात अडकले असल्याचे समोर आले आणि एकरूख्याच्या युवकाच्या संसाराची स्वप्ने उद्ध्वस्त होण्यापूर्वीच राहाता पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. विवाहाच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा भांडाफोड करत पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या पथकाने पुन्हा एकदा आपल्या तपासकौशल्याची छाप उमटवली आहे. विशेष म्हणजे राहाता शहर परिसरात उघडकीस आलेली ही अशा प्रकारची सलग तिसरी घटना असून, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या बनावट विवाह रॅकेटचे धागेदोरे उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणात एजंट अमोल ज्ञानदेव पिंजारी (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर), संगीता शिंदे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर), सोनाली मोहन भोसले (रा. वाटूर फाटा, ता. परतूर) आणि नवरी राधा रमेश काळे (रा. चौधरीनगर, देवमूर्ती, जि. जालना) यांनी संगनमत करून फिर्यादी युवकाची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींनी फिर्यादीकडून १ लाख ६० हजार रुपये घेत आळेफाटा येथे विवाह लावून दिला. त्यानंतर नवरी काही दिवस एकरूखे येथे फिर्यादीच्या घरी वास्तव्यास होती. पुढे फिर्यादीने त्यांच्या रितीरिवाजांनुसार कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात पुन्हा विवाह विधी पार पाडला.

मात्र संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या या विवाहामागे फसवणुकीचे काळे वास्तव दडलेले होते. लग्नानंतर काही दिवसांनी घरासमोर आलेल्या काळे काचा असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडी कडे नवरी राधा काळे जाऊ लागल्याने संशय निर्माण झाला. कुटुंबीयांनी विचारणा करताच संबंधित वाहन तेथून वेगाने निघून गेले. त्यानंतर नवरीने संपूर्ण कटाचा पर्दाफाश करत धक्कादायक माहिती दिली आणि विवाहाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा प्रकार समोर आला.

दरम्यान, एकरूखे गावातून राहाता पोलिसांना अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी तात्काळ पथक घटनास्थळी रवाना केले. प्राथमिक चौकशीत हे प्रकरण वेगळ्याच दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले. मुलीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून तिचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावण्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी करताच मुलीचा पळून जाण्याचा बनाव उघडकीस आला आणि विवाहाच्या नावाखाली युवकाला गंडा घालण्याचा कट समोर आला.

तपासात समोर आले की मुलगा एकरूखे येथील असून मुलगी जालना जिल्ह्यातील आहे, तर विवाह पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे एजंटच्या माध्यमातून लावण्यात आला होता. गुन्ह्याचे कार्यक्षेत्र आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा झिरो एफआयआरद्वारे आळेफाटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. अटक आरोपी एजंट अमोल ज्ञानदेव पिंजारी आणि राधा रमेश काळे यांना पुढील तपासासाठी आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Thailand for Rs 50,000? Travel creators reveal how their Chiang Mai getaway from Hyderabad...

What if your next holiday did not involve another trip to Goa but a passport, a flight to Thailand and a budget...

Ghugni, naru and adda: Bengalis in Pune hold on to Bijoya nostalgia

Devotees participate in the Durga Puja celebrations organised by Nandanik Sanstha at Rohi Villa Palace, Koregaon Park in Pune Pune: The city’s Bengali...

Jalaj Saxena equals Bishan Singh Bedi as Kerala notch up innings win against Odisha...

The ball gripped, the bails flew, and rain threatened to play party-pooper. But Kerala found its voice under the dark, sombre clouds....

In 1992, Reba McEntire helped open a guest house for families sleeping in hospital...

Photo: Reba (L) and her NGOCredit: Reba’s Ranch House / Instagram In 1992, country music star Reba McEntire helped open Reba’s Ranch House...

A happy marriage may hide a health risk: How couples’ daily routines influence biological...

A couple may be happy together, enjoy their evenings on the sofa and look forward to sharing meals after work. But if...

error: Content is protected !!