Homeआरोग्य*श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियेला यश.*—गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी...

*श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियेला यश.*—गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी )

*श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियेला यश.*
शिर्डी, दि. २३ जुलै : श्री साईनाथ रुग्णालयात आज अत्यंत दुर्मिळ, जीवघेणी व वैद्यकीयदृष्ट्या आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शिर्डी येथील एका अल्पवयीन मुलाच्या गुदद्वारातून (मलविसर्जनाच्या जागेतून) टोपणविरहित बॉलपेन शरीरात घुसून आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
रुग्णाची तातडीने तपासणी करून आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर वरिष्ठ जनरल सर्जन डॉ. श्रीराम नाईक यांनी अत्यंत कौशल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेदरम्यान शरीरात खोलवर अडकलेला बॉलपेन सुरक्षितपणे बाहेर काढून जखमी झालेल्या आतड्यांवरील उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे व वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

या शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. महेंद्र तांबे. डॉ गोविंद कलाटे डॉ प्राजक्ता बनकर यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच सिस्टर अनिता कडूस, ब्रदर सुनील सदफळ, सुनील चव्हाण, रवींद्र मते, मच्छिंद्र देवकर, प्रमोद गायके, दिलीप डुंबरे, तुषार आधुडे व संपूर्ण ऑपरेशन थिएटर टीम, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी डॉ. श्रीराम नाईक, डॉ. महेंद्र तांबे यांच्यासह संपूर्ण हॉस्पिटल व ऑपरेशन थिएटर टीमचे अभिनंदन केले. अत्यंत कठीण परिस्थितीत तातडीने निर्णय घेऊन यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि समर्पित वैद्यकीय पथकाच्या बळावर श्री साईनाथ रुग्णालयात अशा जटिल शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पडत असून, गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याची रुग्णालयाची बांधिलकी या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

*पालकांसाठी महत्त्वाचे आवाहन*
लहान मुले खेळताना किंवा खाताना नाणी, शेंगदाणे, फुटाणे, प्लास्टिकचे छोटे तुकडे, बिया किंवा खेळण्यांचे छोटे भाग तोंडात टाकण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेत किंवा अन्ननलिकेत वस्तू अडकून श्वास गुदमरू शकतो. ही अत्यंत गंभीर व जीवघेणी वैद्यकीय आणीबाणी (Medical Emergency) असून अशा वेळी तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
आजच्या सोशल मीडिया आणि रील्सच्या युगात अनेक लहान मुले मोबाईलवर पाहिलेल्या कृतींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईलचा वापर मर्यादित करून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे, तसेच लहान वस्तू त्यांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात, असे आवाहन डॉ. महेंद्र तांबे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Watch: PM Modi meets CWG medallists, says ‘Jo khelega, woh khilega’

PM Modi meets CWG medallists (Screengrabs) Prime Minister Narendra Modi met India’s Commonwealth Games 2026 medal winners at his residence in New Delhi...

Sarfaraz Khan’s first reaction after India call-up for Sri Lanka Test series

Mumbai batter Sarfaraz Khan finally got the news he had been waiting for. After being called up to India's Test squad for...

Kiara Advani stuns in bold white corset and thigh-high slit at Toxic event, fans...

Kiara Advani brought a whole lot of drama to the Toxic trailer launch in Bengaluru on August 8.For the event, the actress...

Housing societies in Pune and Pimpri Chinchwad step up to facilitate SIR process for...

Pune: Extension of the ongoing Special Intensive Revision (SIR) deadline from Aug 8 to Aug 17 has brought relief to many, including housing society...

Former Brazil international arrested after wife makes serious domestic violence allegation

Jadson has been arrested in Brazil following domestic violence allegations involving his wife, while the former Brazil international denies physical assault/Image: X Former...

error: Content is protected !!