Homeताज्या बातम्यामहिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका ...

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी.

ब्रेकिंग न्यूज
Mumbai Milk Price Increase: ‘Ab ghar wali chai bhi Taj Hotel ke rate wali’: Mumbai milk price jumps ₹9, leaving social media users angry, amused and sarcasticKiara Advani looks stunning in a white chiffon saree and breathtaking 78-carat ruby necklace |*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप*—जलीलभाई शेख (समाजसेवक)*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान*—श्री गोरक्ष गाडिलकर ( मुख्य अधिकारी )महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी.Contempt plea in Bombay high court against Pune top cop over ‘failure’ to curtail noise pollutionPCB’s Lord’s Test threat exposed? Sarfaraz Ahmed breaks silence amid fresh controversyToxic Full Movie Collection: Toxic box office collection day 3: Yash-Nayanthara starrer sees 29.3 percent decline; mints Rs 23.75 crore overseas |Bubble wrap was invented for something completely different: The surprising story behind itInner ring road land acquisition gets time-bound push; land hearing cases by Aug 31

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका

राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी.

राहाता, दि. २८ : महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महिलांविरोधात गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत कठोरपणे सामोरे जाऊ, अशी ठाम भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

राहाता नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात डॉ. सुजय विखे पाटील सहभागी झाले. यावेळी नगरसेविका, नगर परिषदेमधील महिला अधिकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच शहरातील भगिनींनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील यांनी महिलांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. नगरसेविकेपासून रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीला माझ्यात तिचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती दिसते, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. सर्वसामान्य महिलांच्या मनात ‘आपण हक्काने दादांकडे जाऊ शकतो’ हा विश्वास निर्माण होणे, हीच माझ्या कार्याची खरी उपलब्धी आहे,असे ते म्हणाले.

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, अतिक्रमण हटविणे अथवा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत काहींकडून टीका करण्यात आली. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, तर दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधली. यावेळी महिलांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यामुळे राहाता नगर परिषदेत पार पडलेल्या या सोहळ्याला भाऊ-बहिणीच्या नात्याचा जिव्हाळा लाभला. महिलांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सन्मानासाठी आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Mumbai Milk Price Increase: ‘Ab ghar wali chai bhi Taj Hotel ke rate wali’:...

Mumbai’s ₹9 milk shock comes just after sugar prices rose; social media reacts with jokes, anger and questions about inflation (AI-generated Image) A...

Kiara Advani looks stunning in a white chiffon saree and breathtaking 78-carat ruby necklace...

Kiara Advani knows how to make a saree look effortless. And this time, she did it in a beautiful white chiffon number...

*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप*—जलीलभाई शेख (समाजसेवक)

*: काष्टीतील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य उपक्रम; जनता कन्या विद्यालयात शालेय साहित्य वाटप* *काष्टी (प्रतिनिधी) -* श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता कन्या विद्यालय...

*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान*—श्री गोरक्ष...

*शिर्डी: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर साईचरणी हिऱ्यांची भेट; गुजरातच्या साईभक्ताकडून साडेचार लाखांचे सोन्याचे ब्रोच दान* *शिर्डी - प्रतिनिधी* श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. भाविक...

Contempt plea in Bombay high court against Pune top cop over ‘failure’ to curtail...

A contempt petition was filed against the Pune police commissioner for failing to control noise pollution PUNE: Akhil Bharatiya Grahak Panchayat and five...

error: Content is protected !!