राहाता प्रतिनिधी
राहाता शहराचे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य अबाधित ठेवण्याचे दृष्टीने तसेच ड्रेनेज लाईन मध्ये गाळ अथवा घाण साचून पाणी तुंबल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी राहाता नगरपरिषदेस स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) २.० अंतर्गत प्राप्त झालेल्या 85 लाख रुपये किमतीच्या सक्शन व जेटिंग ट्रकचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांना वाहनाचीची चावी देऊन करण्यात आले.
यावेळी ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहाता शहराची सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य अबाधित ठेवणे खूप महत्त्वाचे असते त्यादृष्टीने शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी गाळमुक्त व साफ असणे गरजेचे आहे ड्रेनेज लाईन मधील गाळ काढता यावा कचरा व घाण मुक्त ड्रेनेज लाईन असावी याकरिता 85 लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक जर्मन टेक्नॉलॉजी ने बनवलेले वाहन८००० लिटर क्षमता १६ टन गाळ उपसा करण्याची क्षमता असलेले वाहन राहाता नगरपरिषदेस लोकार्पण केले आहे या वाहनाच्या माध्यमातून शहरातील भूमिगत गटारातील गाळ घाण कचरा चांगल्या पद्धतीने साफ केला जाईल त्यामुळे पावसाळ्यात अथवा इतर वेळी गटार तुंबणार नाही सुरळीत वाहतील त्यामुळे स्वच्छता ही टिकून राहील शहरातील नागरिकांचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता खूप महत्त्वाची असून त्या स्वच्छते करिता लागणाऱ्या सोयी सुविधा व यांत्रिक सामग्री साधने कमी पडू देणार नाही पालिकेने शहरातील नागरिकांचे आरोग्याचे व स्वच्छतेच्या दृष्टीने प्रकल्प हाती घ्यावेत त्यास निधी देवु स्वच्छ सुंदर व हरित राहाता बनवावे जर्मन टेक्नॉलॉजीच्या वाहनाच्या साह्याने शहरातील गटारातील सगळी घाण व गाळ कचरा यांची सफाई करून नागरिकांना व व्यापाऱ्यांना दिलासा द्या अशी सूचना यावेळी त्यांनी केली
लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की, शहरातील जनतेने नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वावर व कर्तुत्वावर विश्वास ठेऊन नगराध्यक्ष म्हणून मला आणि माझ्या समवेत सर्व नगरसेवकांना निवडून दिले. शहराचा विकास करण्याचा संकल्प मंत्री विखे पाटील यांनी घेतला आहे आम्ही निवडून आल्यापासून नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अग्निशामक विभागाला फायर आणि रेस्क्यू वाहन, डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महिला भगिनींची तसेच शहराची सुरक्षितता जपण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल मिळाले. विखे पाटील परिवाराने राहाता शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संकल्प केला असून त्या दृष्टीने भरीव निधी विकासाच्या नवनवीन योजना व प्रकल्प राहाता शहरासाठी आणले जात आहे पाच वर्षात राहाता शहराचा विकासात्मक काय पालट होऊन राज्याचे नकाशावर राहाता शहर विकासाचे रोल मॉडेल म्हणून उदयास येईल अशा पद्धतीने कामे सुरू आहेत शहरातील गटारी घाण कचरा व गाळाने तुंबून जात होत्या परिणामी पावसाळ्यात गटारी तुंबल्याने घरात अथवा दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी 85 लाख रुपये किमतीची जर्मन टेक्नॉलॉजी ची सक्शन व जेटिंग वाहन दिल्याने ही समस्या मिटणार आहे नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे आठ हजार टन व 16 टन गाळ उपसण्याची क्षमता असलेली ही गाडी राहत्यातील गटार सफाई करिता वरदान ठरणार असून पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सुद्धा या गाडीचा मोठा फायदा होणार आहे
यावेळी उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक प्रवीण सदाफळ, अजय आग्रे राहुल सदाफळ, दशरथ तुपे संदीप मुर्तडक, अक्षय बोठे नगरसेविका सविता सदाफळ, शीतल बनकर माजी नगरसेवक भीमराज निकाळे, विजय गिधाड, सुरेश माळी प्रभाकर आरणे बाळासाहेब सदाफळ योगेश डांगे प्रदीप बनकर अरुण गाडेकर, वीरभद्र देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ बाळासाहेब सोनटक्के मनीष चितळकर आदी उपस्थित होते.






















