Homeताज्या बातम्यापोळ्याच्या दिवशी उपवास धरून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते—-श्री मदनलाल पिपाडा.

पोळ्याच्या दिवशी उपवास धरून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते—-श्री मदनलाल पिपाडा.

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. हजारो वर्षांपासून आपल्यासाठी राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजेच बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा ! त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी व्यक्त केली. डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप यांची बैलजोड आणुन त्यांची पुजा करुन त्यांना नैवद्य देण्यात आला. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा,मदनलाल पिपाडा,नेमिचंद लोढा,महावीर पिपाडा,लिलाबाई पिपाडा,माया पिपाडा,सागर आनप साहील पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना सौ.पिपाडा म्हणाल्या की, बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त कऱणारा बैलपोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैल हाच ख-या शेतक-याचा मित्र असतो. “आवतन घ्या उद्या जेवायला या!” असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी बैलपोळा सण घरातील बैल अथवा पाळीव प्राण्यांविषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करणारा एक महत्त्वाचा सण आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे पशूपालन करणे. बैलामुळे शेतकऱ्याला शेत नांगरणे सोपे जाते. सहाजिकच बैल हा प्राणी शेतकऱ्याचा जीवाभावाचा सोबती असतो. त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. आज आधुनिक जगात ट्रॅक्टर द्वारे शेत नांगरले जाते. मात्र असं असूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा बैलपोळा मात्र शेतकरी बांधव आवर्जून साजरा करतात. ज्यांच्याकडे बैल नसतात अथवा कामानिमित्त शहरी भागात राहावे लागते असे लोक मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा करतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. बैलांना सजवले जाते आणि त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. बैल पोळ्यासाठी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे. यासाठीच ” आज आवतन घ्या आणि उद्या जेवायला या ” अशा शब्दात बैलांना घरोघरी आमंत्रण दिलं जातं. काही ठिकाणी करमणूक म्हणून बैलांची मिरवणूक काढली जाते. यासाठी घरातील बैलाला सुंदर शाल आणि रंगरंगोटी करून सजवले जाते. हिंदू संस्कृतीत वृक्ष, प्राणी यांची पूजा करण्याची पद्धत आहे.
चौकट-
(गेल्या 65 वर्षापासुन बैलपोळा साजरा करतो या दिवशी उपवास धरुन बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरुन त्यांची सजावट करायचो. 30-40 लोक एकत्र येवुन पुरणाच्यापोळीने उपवास सोडायचो असे मनोगत मदनलाल पिपाडा यांनी व्यक्त केले.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Bengaluru Work Culture: ‘I miss Bangalore’: Woman’s Bengaluru vs Gurgaon work culture comparison sparks...

Woman’s Bengaluru vs Gurgaon work culture comparison sparks debate online Moving to a new city can change the small parts of your daily...

Empress Garden society opposes plan to transfer 2.5 acres for court, revenue dept official...

Empress Garden would not be destroyed, said a govt official Pune: The Agri-Horticulture Society of Western India that manages the Empress Botanical Garden...

‘It’s the last World Cup I’m going to play for India’: Virat Kohli vows...

NEW DELHI: Virat Kohli has revealed that the 2027 ODI World Cup will be his last World Cup for India, with the...

Scientists excluded elephants from East African savanna plots for 15 years; dung beetle numbers...

According to the research published by Science Adviser newsletter, dung beetles rarely attract the attention given to elephants, but their work is fundamental...

Old Bedsheet Reuse Ideas: Don’t throw away old bedsheets: 7 useful things you can...

There's always that one bedsheet tucked at the back of the cupboard, a little faded, maybe a small tear near the edge,...

error: Content is protected !!