
पुणतांब्यात मोतीबिंदू व डोळे तपासणी शिबिर
पुणतांबा, (वा.) मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आप्पासाहेब धनवटे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट पुणतांबा आणि विश्वकर्मा बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील आप्पासाहेब धनवटे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शुभम पवार यांनी डोळ्याच्या शस्त्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डोळ्याचा नंबर, ऑपरेशनचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. शिबिरात बांधकाम कामगारांनी हजेरी
लावून डोळ्यांची तपासणी केली. या उपक्रमात मैड हॉस्पिटलचे शुभम पवार, अभिजीत जगताप, अच्युत सोनवणे, प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे डॉ. कार्तिक नळे, तसेच विश्वकर्मा बांधकाम संघटनेचे अध्यक्ष अरुण साळुंखे, उपाध्यक्ष शिवाजी भोईर, सचिव चांगदेव राजगुरू, संघटक नितीन मारके, सहसंघटक शिवाजी प्रधान, संभाजी पाटील, अशोक पवार, विठ्ठल पवार, प्रकाश हराळे, संजय तवार, शकील शेख, सागर पवार, मंगला धरम, संजीव जाधव आरोग्य मित्र रवींद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात १२२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
डॉ मैड हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ श्री संतोष मैड व डॉ आशुतोष मैड यांनी सर्व स्थरातील गरजू रुग्णांनी हॉस्पिटल घेत असलेल्या सर्व शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घावा असे आवाहन केले आहे




















