ब्रेकिंग न्यूज
Why making people feel seen and heard matters more than confidence*थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का.ल.शिंदे पाटील स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न*—श्री रमेशभाऊ शिंदे ( अध्यक्ष शारदा संकुल राहता )State revises polling station limit from 1,200 to 1,300 votersIndia officially bids for 2028 Thomas & Uber Cup Finals, Delhi in contentionReservation Hatao Andolan: Over 50 detained at Jantar Mantar; reservation should go to poor, not castes: Protesters5 easy tricks to remove dried red chilli seeds without touching them |Dist officials get ready for hearings from Aug 31 to Sept 30Lausanne Diamond League: Neeraj Chopra finishes second by 9cm as Sri Lanka’s Pathirage seals third straight winFadnavis letter: SG flags power tribunal to CJI‘Little fat black shirt’: Bengaluru customer finds shocking body-shaming remark on Subko Coffee bill; coffee chain apologises |

*थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का.ल.शिंदे पाटील स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न*-
(राहाता प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का.ल. शिंदे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सुमारे 165 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.जी .गुंजाळ हे होते वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते त्यातून उत्कृष्ट वक्ते घडतात. विद्यार्थ्यांमधून वक्ते निवडणे हा श्रृत्य उपक्रम आहे असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतच सांगितले. या प्रसंगी डॉ. जयंत गायकवाड यांनी सादरीकरण करणे, वक्तृत्व स्पर्धा ही एक कला आहे, ती आत्मसात केली पाहिजे. शारदा संकुला मधूनच मी वक्तृत्व कला शिकलो याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगितले .डॉ. नजीर शेख यांनी व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा गरजेची आहे. विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढविला पाहिजे त्यामुळे आपल्याला व्यक्त होता येते असे सांगितले. त्यांनी ऊन सावल्या या कवितेचे गायन केले दुःखात पोळलो मी सुखात लोळलो मी या कवितेच्या ओळीने जीवनाचा अर्थ सांगितला व श्रोत्यांची मनी जिंकली.
ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये वक्तृत्व स्पर्धा ही आजच्या काळाची गरज आहे काहीतरी बोला पण काहीतरी बोलू नका. चांगले ऐकले तर चांगलेच बोलता येते .उद्याचा भारत उत्तम वक्ताच घडू शकतो आणि या स्पर्धेतून उत्तम वक्ते घडावेत असे अपेक्षा व्यक्त केली.

संकुलाचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे यांनी स्पर्धेतून आपले अस्तित्व सिद्ध होते .यासाठी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. राहाता तालुक्यातील सर्व पत्रकार हे शारदाचे माजी विद्यार्थी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे .महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये रयत शिक्षण संस्थेचा मोठा वाट आहे .त्यासाठी वक्ते निर्माण झाले पाहिजे यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन संकुलात केली जाते असे सांगितले . याप्रसंगी सर्जेराव मते,रामभाऊ लोंढे,दिलीप खरात, संदीप वाव्हळ, मनीष जाधव, अजय जाधव ,रामनाथ सदाफळ, राजू भाई पठाण ,सचिन बनसोडे ,रामभाऊ लोंढे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.शशिकांत बनकर, विठ्ठल शेजुळ, सुभाष डांगे ,सोपान गमे ,गणेश गमे ,प्रतीक बेलेकर यांनी पारदर्शीपणे काम केले या कार्यक्रमाचे नियोजन संकुलाच्या प्राचार्या शिला संसारे ,कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे ,इंग्लिश मीडियम च्या प्राचार्या निशाचे गोट, उपप्राचार्य जगताप एस. पी., पर्यवेक्षक देशमुख ,पर्यवेक्षक कमल साबळे ,प्रा. बाळासाहेब दिघे, प्रा. रमेश आहेर,यांनी नियोजन केले. प्रा. शरद गमे यांनी सदर कार्यक्रमाचा उद्देश प्रस्ताविकातून सांगितला .आभार कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे यांनी मानले.सूत्रसंचलन सोनाली थोरात यांनी केले





















