महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातुन राज्यभर जलक्रांतीचे काम झाले. ओढे नाले तलाव भरल्यामुळे शेतक-यांना शेती व पशुधनासाठी नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे ब-याच अंशी गोहत्या होण्याला रोख बसला. लातुरचा भुकंप असो किंवा पुरग्रस्तांचा विषय,कोविड सारखी आपत्तीच्या काळात भारतीय जैन संघटना अहोरात्र कार्य करत होती सामाजिक कामामध्ये देशपातळीवर निस्पृहपणे काम करणारी संघटना म्हणुन भारतीय जैन संघटनेची ख्याती आहे. अधुनिक युगातील कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचे काम भारतीय जैन संघचटनेच्या माध्यमातुन चालु आहे. असे मनोगत भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकला यांनी बोलताना यावेळी व्यक्त केले. शिर्डी येथे भारतीय जैन संघटनेचा उत्तर अहिल्यानगर जिल्हाचा मेळावा पार पाडला. यात भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय,राज्य व जिल्हास्तरिय पदाधिकारी उपस्थित होते.भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,भारतीय जैन संघटनेचे राज्याचे प्रमुख केतनाभाई शहा, प्रविणजी पारख,मनसुखजी चोरडीया,संजयजी शिंगवी,जिल्हाध्यक्ष आनंदजी भंडारी,सुमतीलाल गांधी,नरेशजी सुराणा,कमलेश लोढा, निलेश संकलेचा, संघपती अनिलजी पिपाडा,बीजेएसचे नेमिचंदजी लोढा, डॉ.बोरा, शहराध्यक्ष संकेतजी सोळंकी,पियुषजी सोळंकी,पुखराजजी पिपाडा,अँड.बाठीया, स्वप्निलजी भंडारी, संतोषजी लोढा,निलेशजी गंगवाल,आशिष राका,प्राजक्ता भंडारी, संतोषजी चोरडीया,ललितजी मुनावत आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकलाजी पुढे म्हणाले की, समाजातील नव युवक व युतींसाठी जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा मुळ उद्देश होता. 21 व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्या नैतीक जबाबदा-या न विसरता समाजपयोगी कार्य करत राहणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.एकत्र कुटुंब पद्धती फायद्याची होती त्यावेळी घरातील जेष्ठ सदस्यांचा आदरपूर्वक वचक होता. कुटुंब प्रमुख म्हणून तेच मुलामुलींच्या विवाहाचे निर्णय घेत होते, आता मुलामुलींच्या पसंती शिवाय पुढील निर्णय होत नाहीत. कुटुंब व्यवस्था मजबूत करण्याचे काम बीजेएसच्या माध्यमातून होत आहे. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या सहित इतरही वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
चौकट-
(सदर कार्यक्रमा प्रसंगी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा समाजातील तरुण युवकांनी अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे. घरातील जेष्ठ मंडळींनी तरुणांना धाडसी बनवले पाहिजे. गुंडगिरी व दहशत यांच्या विरोधात तरुणांनी एकत्र येवुन प्रतिकार केला पाहिजे. अहिंसेचा अर्थ अन्याय सहन करणे असा नाही. दडपशाहीला न जुमानता तरुणांनी संघटन वाढवुन पुढे येण्याची गरज आहे. धाडसी समाज असल्याची ओळख निर्माण कऱणे गरजेचे आहे. फक्त व्यापार व्यवसाय न बघता समाजिक व राजकीय क्षेत्रात येवुन आपले योगदान देणे गरजेचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समाजाचा सिंहाचा वाटा आहे. दान धर्म असेल किंवा गो-रक्षा असेल अशा प्रत्येक क्षेत्रात जैन समाज आपले योगदान देत असतो.)
(डॉ.राजेंद्र पिपाडा)
(फोटोतील नावे- जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साकला, भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,भारतीय जैन संघटनेचे राज्याचे प्रमुख केतनाभाई शहा, प्रविणजी पारख,मनसुखजी चोरडीया,संजयजी शिंगवी,जिल्हाध्यक्ष आनंदजी भंडारी,सुमतीलाल गांधी,संघपती अनिलजी पिपाडा,नरेशजी सुराणा,कमलेश लोढा, निलेश संकलेचा,बीजेएसचे नेमिचंदजी लोढा, डॉ.बोरा, शहराध्यक्ष संकेतजी सोळंकी,पियुषजी सोळंकी,पुखराजजी पिपाडा




















