*”महिला सक्षमीकरणातून स्वयंरोजगाराची नवी दिशा”*

राहाता : रयत शिक्षण संस्थेच्या शारदा ज्युनिअर कॉलेज, राहाता येथील कर्मवीर करिअर अकॅडमीच्या वतीने *महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास* उपक्रमांतर्गत महिलांसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सौ. अनिता वहाडणे व सौ. रजनी चावरे यांनी महिलांना शिवणकला, पार्लर, आरी वर्क यांसह विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी उपलब्ध कौशल्यांचा प्रभावीपणे उपयोग करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
महिलांच्या कौशल्य विकासाला चालना देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती. एस. एफ. संसारे होत्या. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस. पी. जगताप यांच्यासह शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. एस. एस. तनपुरे, प्रा. एच. एस. बारगळ, प्रा. के. आर. निकम व प्रा. पी. जी. चोळके यांनी विशेष सहकार्य केले. तसेच तांत्रिक सहाय्यक म्हणून प्रा. डॉ. ए.ए.पठाण व प्रा. अश्विनी वेलजाळी यांनी योगदान दिले. प्रा. टी. आर. वाघमारे यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण करून उपक्रमातील महत्त्वपूर्ण क्षणांचे दस्तऐवजीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आर. एन. घोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. एस. डी. पवार यांनी केले.





















