
श्री साई पारायण तीर्थयात्रा २०२६; काशी-अयोध्या, नेपाळ पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी
शिर्डी : प्रतिनिधी
‘ॐ साई राम’च्या जयघोषात साईभक्तांना काशी-अयोध्या, नेपाळ पशुपतीनाथ व मनोकामना मंदिर दर्शनाची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. मार्गदर्शक मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी ग्रामस्थांच्या आयोजनातून ‘श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६ (संकल्पपूर्ती)’ या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत श्री क्षेत्र काशी, अयोध्या, नेपाळमधील श्री पशुपतीनाथ, बुद्धनाथ आणि मनोकामना मंदिर आदी प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तब्बल २५ हजार साईभक्तांनी १२ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेत सहभाग घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पेशल रेल्वेने होणार धार्मिक प्रवास
यात्रेसाठी शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने प्रवास होणार आहे. वाराणसी येथे आगमनानंतर गंगा आरतीचा अनुभव, त्यानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमी, कनक भवन, हनुमानगढी व राजदरबार आदींचे दर्शन घेण्यात येणार आहे. साईभजन संध्येनंतर रेल्वेने पुढील प्रवास केला जाणार आहे.
यानंतर नेपाळकडे प्रयाण करून काठमांडू येथे मुक्काम, श्री पशुपतीनाथ व बुद्धनाथ दर्शन, भजन संध्या तसेच काठमांडू दर्शनाचा कार्यक्रम आहे. पुढे मनोकामना मंदिर येथे दर्शन घेऊन नौतनवा येथे आगमन व तेथून विशेष रेल्वेने शिर्डीकडे परतीचा प्रवास होणार आहे.
१४०० साईभक्तांचे बुकिंग; आता केवळ १०० जागा शिल्लक!
या विशेष तीर्थयात्रेसाठी आतापर्यंत १,४०० साईभक्तांनी बुकिंग केले असून आता केवळ १०० जागा शिल्लक असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे इच्छुक साईभक्तांनी विलंब न करता आपले बुकिंग निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवास शुल्क :
नॉन एसी ट्रेन : ₹१४,१००
थ्री टियर एसी ट्रेन : ₹१८,१००
टू टियर एसी ट्रेन : ₹१९,१००
यात्रेच्या शुल्कामध्ये दोन वेळचे जेवण, एक वेळचा नाश्ता तसेच चार व्यक्तींमागे एका खोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी पूर्ण भाडे आकारले जाणार आहे.
यात्रेसाठी बुकिंग करताना आधारकार्डची झेरॉक्स, मतदान कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट फोटो सोबत आणावा. प्रवासादरम्यान मूळ आधारकार्ड जवळ ठेवणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
यात्रेच्या अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क :
९९२१५२९९९९ / ९०९६९१९१९१
श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट | श्री साई निर्माण ग्रुप
मा. श्री कैलास बाप कोते | मा. श्री विजय भाऊ कोते





















