Homeताज्या बातम्यासुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वा खालील जनसेवा पॅनेल cha दणदणीत विजय—पारनेर दुध...

सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वा खालील जनसेवा पॅनेल cha दणदणीत विजय—पारनेर दुध संघ निवडणूक.

पारनेर दूध संघ निवडणूक: सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील ‘जनसेवा’ पॅनेलचा दणदणीत विजय

डॉ. सुजय विखेंनी दिली निलेश लंकेंना धोबीपछाड!

पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने जोरदार विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. १५ पैकी तब्बल १२ जागांवर त्यांच्या गटाने बाजी मारली आहे.

या निवडणुकीत डॉ. विखे यांनी थेट मोर्चा हाती घेत, कार्यकर्त्यांची संघटित मोहीम राबवली. खासदार निलेश लंके यांच्या ‘सहकार’ पॅनलशी थेट मुकाबला करताना विखे पाटील यांना विद्यमान आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले. परिणामी चुरशीच्या लढतीत विखे गटाने स्पष्ट आघाडी घेतली.

दूध संघाला नवे भविष्य देण्याचा संकल्प

पारनेर तालुका दूध संघ मागील १० वर्षे बंद होता. चार वर्षांपूर्वी पुन्हा सुरू झाल्यानंतर सध्या दररोज 6,000 लिटर दूध संकलन सुरू आहे, तर पूर्वी हे प्रमाण 70,000 लिटर होते. विखे पाटील यांनी संघाचा कारभार पुन्हा शेतकरी व संचालकांच्या हाती देऊन, त्याला गतवैभव परत मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

तालुक्याच्या राजकारणात विखेंची छाप

या विजयामुळे सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रात आपला प्रभाव अधिक दृढ केला आहे. दूध संघाचा कारभार त्यांच्या जनसेवा पॅनेलकडे गेल्याने पुढील काही वर्षे तालुक्याच्या सहकार व राजकारणात विखे गटाचा दबदबा राहण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरचा राजकीय पट पूर्णपणे बदलला. ज्या-ज्या ठिकाणी निलेश लंके यांचे वर्चस्व होते, तिथे-तिथे विजयाची पताका डॉ. विखेंच्या समर्थकांनी फडकवली. मग ती आमदारकीची निवडणूक असो किंवा विविध संस्थांच्या कारभारातील सत्ता असो, प्रत्येक ठिकाणी लंकेंना पराभवाची चव चाखावी लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

All-party meet must discuss flagged SIR discrepancies: Supriya

Pune: NCP (SP) working president Supriya Sule on Wednesday demanded an all-party meeting to discuss the alleged discrepancies in the SIR exercise.Supriya...

‘The night I could not sleep’: Gautam Gambhir opens up on ‘toughest decision’ to...

vaibhav sooryavanshi, gautam gambhir, sanju samson India head coach Gautam Gambhir has revealed the emotional difficulty behind one of his biggest selection calls...

‘Bigger deal’ on table: US, China extend trade truce by two months as Xi...

File photo: US president Donald Trump and China's President Xi Jinping participate in an arrival ceremony at Joint Base Andrews, Md. (AP Photo)...

Top 5 darkest countries in the world in 2026: Where travellers can still see...

Imagine travelling to a destination just to experience the darkest skies! The night sky can be a destination in itself. Far from...

Dhol-tasha event during Ganeshotav at Pune hospital sparks outrage, FIR against 6

The high-decibel performance was held outside the hospital’s super specialty heartcare unit and advanced diagnostics facilityThe high-decibel performance was held outside the hospital’s...

error: Content is protected !!