
साईयोग फाउंडेशनच्या वतीने जेष्ठ पत्रकार दिलीप खरात सन्मानित……
राहाता प्रेस क्लब चे उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार दिलीप खरात यांना श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने पत्रकारीका क्षेत्रातील मनाचा स्वर्गीय वसंतराव देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल राहाता येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे साईयोग फाउंडेशन द्वारे रविवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप खरात यांचा फेटा बांधून श्रीसाई शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राहाता प्रेस क्लब चे अध्यक्ष रामभाऊ लोंढे व जेष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सुरुवातीला साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना पत्रकार दिलीप खरात यांच्या पत्रकारिकेतील निर्भीड व वास्तव्यवादी वृत्तीचा उल्लेख करत साईयोग फाउंडेशनच्या कार्याचे निस्वार्थपणे नेहमीच कौतुक करण्यासाठी धन्यवाद दिले. रामभाऊ लोंढे यांनी पत्रकार दिलीप खरात हे फक्त पत्रकार नाही तर सर्व समान्यांना तसेच शासकीय अधिकाऱ्यांना अडीअडचणीत मदत व मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळेच ते सन्मानाला पात्र आहेत.सत्काराला उत्तर देताना पत्रकार दिलीप खरात यांनी साईयोग फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक करत सत्कार केल्याबद्दल आभार मानले. शेवटी नगरसेवक दशरथ तुपे यांनी दिलीप खरात यांच्या कार्याचा गौरव करत सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य राजेंद्र बांगर यांना वाढदिवसानिमित सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते कातनाला परिसरात बांबूचे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी योगगुरू सुरेश भिंगारदिवे, साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, पांडुरंग तुपे, ॲड गोरख दंडवते, ॲड दिगंबर धनवटे, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर, संदीप डांगे, मनोज पिपाडा, परमेश चव्हाण, अनिल सातव, बबलू फटांगरे, दिपक दंडवते, विठ्ठल निर्मळ, संजय वाघमारे, दिपक गाडेकर, व्यंकटेश अहिरे, ज्ञानेश्वर आरणे, रंगनाथ सदाफळ, अशोक वाणी, उमेश लुटे, शिवाजी पोटे, नारायण गाडेकर, कैलास चेणुके, बाळासाहेब तारगे, प्रणव लावर आदी मान्यवर उपस्थित होते.





















