श्री हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने मारुती मंदिरात 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राहाता, दि. 1 मे: श्री हनुमान चालीसा सेवा मंडळ, राहाता यांच्या वतीने मारुती मंदिरात नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, माजी नगराध्यक्ष कैलास बाप्पू सदाफळ, निलेश तारगे, अभिजित पिपाडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फेटा, शाल, पेन व श्री मारुतीरायाची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे, संजय शिंदे, दर्शन खांबेकर, सुरेश देव्हारे, सुनील देव्हारे, ओम सोमवंशी, साई खांबेकर, धनराज शेटे, किशन बिडवे, मीराबाई कुंभकर्ण, अनुराधाताई झळके आदींनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व भाविक उपस्थित होते.




















