Homeताज्या बातम्याशिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०७...

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०७ वा श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात —गोरक्ष गाडीलकर ( मुख्य कार्यकारी अधिकारी)

शिर्डी –
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०७ वा श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात झाली असून मुंबई – शिर्डी येथील साई व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व समुद्र मंथनातून प्रकटलेल्या रत्नांवर आधारित ‘श्री साईरत्न’ हा भव्य व आकर्षक देखावा तर ओरीसा येथील दानशुर साईभक्‍त‍ सदाशिव दास यांच्‍या देणगीतून मंदिर व मंदिर परीसरात करण्‍यात आलेल्‍या आकर्षक फुलांच्‍या सजावटीने श्री साईभक्‍तांचे लक्ष वेधून घेतले.
उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. आरतीनंतर पहाटे ०५.४५ वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी विणा घेऊन तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व प्रशासकिय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक व्‍दारकामाईत आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी व्दितीय, प्र.उपकार्यकारी अभियंता संजय जोरी यांनी तृतीय, प्र. अधिक्षक रामदास कोकणे यांनी चौथ्‍या व प्र. विभागप्रमुख राहुल गलांडे यांनी पाचव्‍या अध्‍यायाचे वाचन केले.
सकाळी ०७.०० वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्निक श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत श्री विजय घाटे, पुणे यांचा ‘साईभजने’ कार्यक्रम, दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प. सौ. हर्षाली देशपांडे, नाशिक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तर सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती, रात्रौ ०७.०० ते ०९.०० यावेळेत श्री नाना वीर यांचा ‘साई भजन संध्‍या’ हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्‍न होणार असुन, रात्रौ ०९.१५ वाजता गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. मिरवणूकीनंतर श्रींची शेजारती होईल. तर अखंड पारायणासाठी श्री व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्‍यात येणार आहे.

गुरूवार, दिनांक ०२ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. सौ. शोभना देशपांडे, नाशिक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्री बबलु दुग्‍गल, पुणे यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्री रोहित दुग्‍गल, श्रीरामपुर यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम, सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. सायं.०७.३० ते १०.०० वा. श्री शैलेंद्र भारती, मुंबई यांचा ‘साईभजन संध्‍या’ कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.३० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक ०२ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०३ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Ankur Warikoo reveals 3 rules for raising independent kids and his relationship advice stands...

Ankur Warikoo and his wife Ruchi Warikoo. What do children really learn about relationships at home?For entrepreneur and content creator Ankur Warikoo, it...

Pune man loses Rs4.17 lakh to cybercrooks in mobile tower installation fraud

Pune: Cybercrooks duped a 31-year-old resident of Mangdewadi in Katraj of Rs4.17 lakh on the pretext of installing a mobile tower on...

‘I now know I was wrong’: Hikaru Nakamura breaks silence after chaotic EWC match...

Grandmaster Hikaru Nakamura has explained what happened during his chaotic third-place match against Alireza Firouzja at the Esports World Cup 2026, after...

Trump eyes millions from personal political funds for GOP amid midterm pressure: Report

Republicans are increasingly worried that the prolonged Iran war and high gas prices could hurt voter turnout in November. US President Donald Trump...

5 signs of ‘empty nest syndrome’ and how to cope

For years, a parent’s day can revolve around someone else’s schedule. Breakfast before school, forgotten lunch boxes, exam stress, late-night conversations, weekend...

error: Content is protected !!