Homeताज्या बातम्याशिर्डी शहरात अतिवृष्टीमुळे सातत्याने होणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी नियंत्रणात आणण्यासाठी साई संस्थांने...

शिर्डी शहरात अतिवृष्टीमुळे सातत्याने होणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी नियंत्रणात आणण्यासाठी साई संस्थांने शिर्डी नगरपरिषदेस भरीव निधी उपलब्ध करून द्यावा——श्री रमेश गोंदकर ( राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष नेते)

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी शहरात अतिवृष्टीमुळे सातत्याने होणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी नियंत्रणात आणण्यासाठी साई संस्थांने शिर्डी नगरपरिषदेस भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश गोंदकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना गोंदकर म्हणाले अतिवृष्टीमुळे शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन , रहिवासी भागात व्यावसायिक तसेच शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले .यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी साईबाबा संस्थाने भरीव निधीची तरतूद करून पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन २०२२ मध्ये शिर्डीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्याचा फटका शिर्डी शहराला प्रचंड पावसामुळे शिर्डी शहर अक्षरशा जलमय होऊन शिर्डी शहरात पाण्याने विळखा घातला होता रहिवासी व व्यावसायिक शेतकरी यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले होते. साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालय , द्वारावती भक्त निवास, प्रसादालय , नवीन दर्शन रांग व संस्थांच्या इतर इमारती मध्ये पावसाचे पाणी गेल्याने साई भक्तांची तसेच रुग्णांची गैरसोय झाली होती.तसेच साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तसेच साई आश्रम दोन मध्ये हलविण्याची नामुष्की संस्थांवर आली होती. तसेच द्वारावती भक्त निवास, प्रसादालय व दर्शन रांगेतून साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची देखील अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यामुळे गैरसोय झाली. तीच परिस्थिती मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शिर्डी शहरातील नागरिकांना अनुभवास मिळाले. परिणामी शिर्डीतील श्रीरामनगर ,गणेशवाडी, विठ्ठलवाडी , विठ्ठला नगर, आनंदनगर, हेडगेवारनगर ,शिवाजीनगर नाला रोड व शहरातील पश्चिम भागात तसेच पूर्व भागातील कालिकानगर ,मातोश्री नगर, राजगुरुनगर ,कचरा डेपो या परिसरात शीर खंडे ओढ्याला पूर आल्याने प्रचंड पावसाचे पाणी जाऊन नागरिकांचे हाल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती 2017 व. 2022 मध्ये पूर परिस्थितीचा सामना शिर्डीकरांना करावा लागल्याने यावर मार्ग काढण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांना लेखी पत्र देऊन आपण साई संस्थांना या प्रश्नाबाबत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशी चर्चा केली होती त्या अनुषंगाने त्यांनी श्री साईबाबा संस्थान ला प्रस्ताव देखील पाठवला याबाबत तत्कालीन तदर्थ समितीचे अध्यक्ष यारला गट्टा साहेब तत्कालीन जिल्हाधिकारी सालीमठ साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला परंतु श्री साईबाबा संस्थाने संस्थांनी गांभीर्याने घेतली नाही त्यामुळे सातत्याने होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे संस्थांच्या मालकीच्या असलेल्या इमारतींना धोका निर्माण होत असून भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होते यावर तोडगा काढण्याकरिता शिर्डी नगर परिषदेने नांदुर्खी रस्ता ते साईनाथ रुग्णालय पासून नाला क्रमांक ३४ पर्यंत व नांदुर्खी कनकुरी शिव रस्ता या ठिकाणी ४ ते ५ फूट उंचीचे सिमेंटचे पाईप लाईन टाकली तर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास नक्कीच मदत होईल व प्रत्येक वर्षी अतिवृष्टीमुळे व्यवसायिक ,रहिवासी व शेतकरी यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल. साईबाबा संस्थाने राज्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीसाठी ५ कोटी निधी दिला त्याबद्दल संस्थांचे अभिनंदन मात्र देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तांचि अतिवृष्टीमुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी साईबाबा संस्थानै तात्काळ निधी का उपलब्ध करून देत नाही हा प्रश्न शिर्डीकरांना पडला आहे पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता तात्काळ शिर्डी नगरपरिषद भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Devdutt Padikkal’s 131 headlines India’s dominant Day 1 at 288/2 in Galle on Independence...

Galle: India's Rishabh Pant, left, and Devdutt Padikkal on day one of the first test cricket match between India and Sri Lanka, in...

Doom! Board lowers the boom on Indian-American CEO who fired 900 employees over Zoom

Vishal Garg made headlines in 2021 after he fired 900 employees over a video call. TOI Correspondent from Washington: Indian-American entrepreneur Vishal Garg,...

श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ...

श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित,श्री साई-श्रद्धा ग्रामीण मुक-बधिर विद्यालय (निवासी) शिर्डी ता-राहाता जि-अहिल्यानगर येथे आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी"*भारतीय स्वातंत्र्य...

*शारदा शैक्षणिक संकुलात राष्ट्रध्वजाला वंदन*-श्री रमेशभाऊ शिंदे (अध्यक्ष )

*शारदा शैक्षणिक संकुलात राष्ट्रध्वजाला वंदन*-श्री रमेशभाऊ शिंदे (अध्यक्ष ) (राहाता प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या...

Trisha Krishnan keeps it classic in a mustard saree as she attends CM Vijay’s...

Trisha kept the rest of her look equally traditional.Her hair was parted down the middle and pulled into a long fishtail braid, which she...

error: Content is protected !!