शिर्डी येथील कै. भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व जगन्नाथ चंद्रभान लुटे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि 28 सप्टेंबर रोजी शिर्डी शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवले असून या शिबिराचा मोठ्या संख्येने रुग्ण व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर व लुटे पारिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
मोफत आरोग्य तपासणी शिबिरा बाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर सचिन लुटे परिवाराच्या सदस्यांनी सांगितले की कै.भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व लुटे परिवार शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करणार आहे या शिबिरात जनरल मेडिसन शस्त्रक्रिया तज्ञ अस्थिरोग तज्ञ स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ फिजिओथेरपी तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय दृष्ट्या औषधोपचार देऊन मार्गदर्शन करणार आहे या शिबिरामध्ये कन्सल्टंट न्यूरो सर्जन डॉ हर्षा सुरेश प्रसुती आणि स्त्री रोग तज्ञ डॉ हेमलता हृदयरोगतज्ञ डॉ सतीश, कम्युनिटी मेडिसिन तज्ञ डॉ. फनींद्र यांच्यासह इतर तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत शिर्डी शहरातील कनकुरी रोड लगतचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर स्थळी ही शिबिर संपन्न होणार असून या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्ण अथवा नागरिकांनी आपल्याकडील पूर्वीचे जुने रिपोर्ट कागदपत्रे सोबत आणावी या शिबिरात तपासणी झाल्यानंतर गोळ्या व औषधे मोफत दिले जाणार असल्याचे सचिन लुटे व दीपक गोंदकर यांनी मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान परिवाराच्या वतीने केले आहे




















