*शिर्डीत युवकांसाठी शिवसेनेचा “वाचनालय उपक्रम” – 17 जुलैला भव्य उद्घाटन*

*शिर्डी:* शिवसेना शिर्डी शहर यांच्या वतीने शिर्डी परिसरातील युवकांना वाचनाची गोडी लागावी यासाठी “वाचनालय उपक्रम” सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे भव्य उद्घाटन शुक्रवार दि. 17 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार *श्री. सतिश वैजापूरकर* यांच्या हस्ते होईल.
यावेळी खासदार *श्री. भाऊसाहेब वाकचौरे*, माजी खासदार *श्री. सदाशिव लोखंडे*, संपर्कप्रमुख *सौ. ज्योतीताई घाडमरे*, सेवेनिवृत्त देवदेवेश्वर अधिकारी *डॉ. श्री. पांडुरंग गुंजाळ*, शिवसेना जिल्हाप्रमुख *श्री. कमलाकर कोते पा.* यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा उपक्रम *हॉटेल तानिया समोर, मंडई पॅलेस चौक, शिर्डी* येथे आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमात शिर्डी परिसरातील सर्व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन *आयोजक श्री. अमोलभाऊ लोंढे, शिवसेना शिर्डी शहर* आणि *A.L. संघर्ष प्रतिष्ठान, शिर्डी शहर 999* यांच्याकडून करण्यात आले आहे.




















