

काल सायंकाळी नेहमी प्रमाणे हाजी मुन्नाभाई शहा यांच्या ऑफिस ( मुन्नाभाई शहा कट्टा ) ला जात असताना शेजारीच राहाता चे प्रसिद्ध भडांगे चहा येथे आमचे शालेय मित्र संजयभाऊ उपाध्ये यांनी राजुभाई चहा घ्यायला इकडे या आवाज दिला.संजु भाऊ मी बालमित्र असल्याने लगेच जावून त्यांच्या शेजारी बसलो.चहा आला चहा घेतला.राहाता नगरपरिषदेची निवडणूक आहे तीचीही भरपूर चर्चा झाली.कोण उमेदवार नगरसेवक किवा नगराध्यक्ष पदास योग्य अयोग्य अशी एकमेकांचे विचाराची देवाण घेवाण झाली.शाळे चा विषय आला आणि प्रतेकाने आपला शाळेचा अनुभव सांगताना शारदा शाळेचे पी टी शिक्षक सय्यद सर ( सय्यद महमद हसन)यांचा आवर्जुन उल्लेख केला.
संजय उपाध्ये यांनी सांगितले की सय्यद सरांच्या हाताखाली आम्ही शिकलो हे आमचे भाग्य असून सय्यद सर देवमाणूस होते आमच्यासाठी.सय्यद सर म्हणजे देव अशी प्रतिक्रिया संजय निरगुडे यांनी दिली.
सुभाष नाना चुलभरे म्हणाले की सय्यद सरांचा दरारा होता सर्व विद्यार्थी त्यांना घाबरून असत.त्यांच्या मुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली.
शामराव दंडवते ही सय्यद सरांचे विद्यार्थी होते त्यांनी सांगितले की जानेवारी,१५ ऑगस्ट ला सय्यद सरांची शिस्तीत शाळेची गावातील मिरवणूक,परेड,या सर्व कार्यात विशिष्ठ लकब व पकड होती.
संजय उपाध्ये म्हणाले की वेळवर नाही आले शाळेत किवा प्रार्थनेस गैर हजर झाले तर सर चोपून काढायचे व ग्राउंड ला चकरा मारण्यास लावत होते.त्यावेळेस दुःख होत होते पण आज वाटते की सय्यद सारखेच शिक्षक आज च्या विद्यार्थ्यांना गरजेचे होते पण आज काळ बदलला,शाळा ,शिक्षक व विद्यार्थी ही बदल ले आहेत.पण आम्ही व सर्वच विद्यार्थी,सहकारी किवा शारदा विद्या मंदिर सय्यद सराना कधीही विसरणार नाही आणी त्यांचा करारी बाणा,कडक आवाज ,वेळेचे महत्व व शिस्त आजन्म नाही विसरणार.
काही काळापूर्वी सय्यद सरांची तबियत थोडी खराब होती त्यावेळेस सर्व त्यांचे चाहता वर्ग त्याना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला.माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई राधाकृष्ण विखें पाटील ही त्याना भेटून विचारपूस करून गेल्या.हाजी श्री मुन्नाभाई शहा,श्री दिलीपभाऊ सूर्यवंशी,राजूभाई पठाण निकाळे सर इतर मित्र वर्ग ही सराना भेटण्यास गेला होता.
यावेळी संजय उपाध्ये,शामराव दंडवते,संजय निर्गुडे,सुभाष आण्णा चुलभरे,प्रमोद निरगुडे इतर मान्यवरांसह पत्रकार राजुभाई पठाण उपस्थित होते.



















