Homeताज्या बातम्या*वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक सुनील गाडेकर यांचा स्तुत्य उपक्रम* *कुसुमाग्रज...

*वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक सुनील गाडेकर यांचा स्तुत्य उपक्रम* *कुसुमाग्रज अभियानांतर्गत पाच शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट*—श्री दत्ता गायकवाड सर

*वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक सुनील गाडेकर यांचा स्तुत्य उपक्रम*

*कुसुमाग्रज अभियानांतर्गत पाच शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट*

राहता : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी तसेच कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून आलेल्या उपक्रमाच्या उद्देशाने उद्देशाने सेवानिवृत्त शिक्षक . सुनील पांडुरंग गाडेकर यांनी एक अनुकरणीय उपक्रम राबविला.

गाडेकर यांनी आपल्या अध्यापनाच्या कारकिर्दीत ज्या शाळांमध्ये सेवा बजावली, त्या पाच शाळांना गणेशनगर, एकरुखे , नपावाडी, कोऱ्हाळे, देर्डे कोऱ्हाळे या शाळांना प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची पुस्तके स्वखर्चाने भेट दिली. अशा प्रकारे एकूण २५ हजार रुपये किमतीची पुस्तके विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

शिक्षक म्हणून दीर्घकाळ विद्यार्थ्यांना ज्ञानदान केल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासासाठी योगदान देण्याची त्यांची तळमळ या उपक्रमातून दिसून आली. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि विविध माध्यमांमुळे वाचनाची सवय कमी होत असताना, विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तके वाचावीत, अवांतर वाचनातून ज्ञानाचा विस्तार करावा आणि साहित्याची गोडी निर्माण करावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

“वाचनातून विचार समृद्ध होतात, विचारातून व्यक्तिमत्त्व घडते आणि व्यक्तिमत्त्वातून समाजाची जडणघडण होते,” या विचारातून गाडेकर सर यांनी आपल्या सेवाकाळातील शाळांशी असलेले ऋणानुबंधही जपले आहेत.

या उपक्रमामुळे संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होणार असून, त्यांच्या वाचनाची आवड आणि ज्ञानाची क्षितिजे अधिक व्यापक होण्यास निश्चितच मदत होणार आहे. सेवानिवृत्तीनंतरही शैक्षणिक क्षेत्राशी आपले नाते कायम ठेवत समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कुसुमाग्रज अभियानाच्या माध्यमातून वाचनाची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनात तेवत ठेवण्याचा गाडेकर सरांचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे पंचायत समिती राहाता गटविकास अधिकारी विवेक गुंड तसेच गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ, केंद्रप्रमुख सचिन घुसळे यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

BFI headed for showdown: Secretary general calls SGM to move no-confidence motion against federation...

Boxing Federation of India (BFI) president Ajay Singh NEW DELHI: The Boxing Federation of India (BFI) is headed for a showdown, with secretary...

Walt Disney quietly assembled more than 27,000 acres in Florida through secret transactions for...

Walt Disney’s plan for what would become Walt Disney World began with a remarkably quiet real-estate operation. According to Disney’s D23 archives,...

What you see first claims to reveal whether you are a practical thinker or...

Optical illusion personality tests are interesting brain teasers that trick the brain and eyes into believing what a person sees first among the many...

Nana Patekar’s last journey: Mortal remains leave Goa for Pune, state funeral announced

Nana Patekar, the illustrious actor renowned for his roles in Indian cinema, sadly passed away at his Goa residence PUNE: The mortal remains...

Sports Ministry, Federations to review Asian Games performance on October 13: Sources

Indian Contingent (AP Photo) NEW DELHI: Officials of the Ministry Of Youth Affairs and Sports of India (MYAS) and the National Sports Federations...

error: Content is protected !!