Homeताज्या बातम्यालोणी खुर्दने जपली कृतज्ञतेची परंपरा; शिर्डीचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे...

लोणी खुर्दने जपली कृतज्ञतेची परंपरा; शिर्डीचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांना अभिवादन

लोणी खुर्दने जपली कृतज्ञतेची परंपरा; शिर्डीचे पहिले आमदार स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांना अभिवादन

राहाता प्रतिनिधी : शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार तथा सहकार, शिक्षण व ग्रामविकास क्षेत्रातील ज्येष्ठ नेते स्व. चंद्रभान भाऊसाहेब घोगरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणी खुर्द येथे विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांनी कृतज्ञतापूर्वक त्यांच्या कार्याला उजाळा देत विनम्र अभिवादन केले.

लोणी येथील रयत शिक्षण संकुलात प्राचार्य डहाळे सर, अमोल कडू सर तसेच शिक्षक वृंद, अमोल घोगरे, सचिन मुन्ना आहेर, सुहास आहेर,गौतम आहेर यांच्या उपस्थितीत स्व. घोगरे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

तसेच ग्रामपंचायत कार्यालय, लोणी खुर्द, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच स्व. घोगरे पाटील यांच्या स्मृतीस्थळीही अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते आबासाहेब आहेर, उत्तमराव आहेर, आप्पासाहेब घोगरे, देवमन घोगरे, दिलीपराव घोगरे, दीपक घोगरे, बाळासाहेब गाडगे, एकनाथ पाटील घोगरे, सरपंच जनार्दन घोगरे, दत्तात्रय घोगरे यांच्यासह घोगरे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. सहकार, शिक्षण, ग्रामविकास आणि लोकसेवा या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगण्यात आले. शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य, सर्वसामान्य जनतेशी ठेवलेला जिव्हाळा आणि विकासासाठी घेतलेले पुढाकार आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

स्व. चंद्रभान दादा घोगरे पाटील यांनी पोलिस पाटील, सरपंच, सहकारी संस्थांचे संचालक व अध्यक्ष, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत समाजविकासासाठी आयुष्य समर्पित केले. साधी राहणी, लोकांशी आत्मीयतेचे संबंध आणि निस्वार्थ लोकसेवा हीच त्यांची खरी ओळख होती.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!