साकुरी येथील चौधरी पाटील परिवाराच्या वतीने ह.भ.प. रूपालीताई सवणे-परतूरकर यांचे जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन

*राहाता/साकुरी (शिर्डी आवाज न्यूज) -* कै. गंगाभागिरथी पार्वतीबाई माधवराव चौधरी यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध निमित्ताने श्राद्ध व हरिकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम *शुक्रवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, सिद्ध संकल्प मंगल कार्यालय, नगर-मनमाड हायवे, साकुरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर* येथे होणार आहे.
या प्रसंगी ह.भ.प. रूपालीताई सवणे-परतूरकर (फाकड) यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. कै. पार्वतीबाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन *श्री भाऊसाहेब माधवराव चौधरी (चेअरमन – राहाता पिपल्स नागरी सहकारी पतसंस्था, राहाता) मो. 9552937115* व समस्त चौधरी पाटील, नांदुर्खी व साकुरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.




















