

राहात्याने सदैव विखे पाटलांवर प्रेम केलं — सुजय दादांचा जनतेवरील विश्वास दृढ
राहाता येथील कुंदन लॉन्समध्ये झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी राहात्याच्या राजकीय इतिहासावर आणि जनतेशी असलेल्या विखे परिवाराच्या नात्यावर ठाम भाष्य केले.
“नेत्याचे काम आव्हान देण्याचे असते आणि राहाता काय करेल हे मलाही माहित आहे. राहात्याने सदैव विखे परिवारावर प्रेम केलं आहे,” असं सांगत दादांनी जनतेवरील आपला विश्वास दृढ केला. त्यांनी स्पष्ट केलं की राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर राहात्याच्या विकासाची नवी दिशा ठरली महिलांच्या सुरक्षेपासून ते रस्त्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्येपासून ते शहरी पायाभूत सुविधांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात काम झालं.
“राजकारणात संधी सर्वांना मिळावी, वंचित राहिलेल्यांना आता संधी मिळणार. आमचं संघटन मजबूत आहे, आणि मला खात्री आहे राहात्याच्या माता-भगिनी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो आणि महायुतीचं चिन्ह पाहूनच मतदान करतील,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, “आता आम्ही ठरवलं आहे की ठराविक मोजक्या लोकांभोवतीच राजकारण फिरवायचं दिवस संपले. आम्ही जनतेत थेट जाऊन संवाद साधणार आहोत. राहाता आणि शिर्डी नगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकवणार हे ठरलेलं आहे.” या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राहात्यात पुन्हा एकदा विखे परिवाराचा जनाधार घट्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत.




















