Homeमहत्त्वाचेराहाता : राहाता शहरातील गणेश परिसरातील नागरिकांकडून महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदारपदी...

राहाता : राहाता शहरातील गणेश परिसरातील नागरिकांकडून महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार

राहाता :
राहाता शहरातील गणेश परिसरातील नागरिकांकडून महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना आमदार विवेक कोल्हे यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधत स्वाभिमान, सहकार आणि जनतेच्या विश्वासाचा मुद्दा ठळकपणे मांडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आयोजकांनी गणेश परिसर असा उल्लेख केल्यानंतर विवेक कोल्हे यांनी तत्काळ दुरुस्ती करत हा फक्त गणेश परिसर नाही, तर स्वाभिमानी गणेश परिसर आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. या परिसरातील नागरिकांनी कोणत्याही दबावाला किंवा दहशतीला न जुमानता अन्यायाविरोधात उभे राहत दहशतीचे झाकण उडवले, असे म्हणत त्यांनी परिसरातील नागरिकांच्या धैर्याचे कौतुक केले.

आपल्या भाषणात त्यांनी पुढे सांगितले की, मी पुणतांबा येथून जात असताना काही नागरिकांनी माझी गाडी अडवली आणि गणेश कारखान्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांची अपेक्षा रास्त आहे, कारण मी सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू आहे. या विधानातून त्यांनी सहकार क्षेत्राशी असलेले आपले नाते अधोरेखित करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेश दिला.

विवेक कोल्हे यांच्या भाषणातील दहशत, स्वाभिमान आणि कारखान्याच्या प्रश्नात लक्ष घालणार या उल्लेखांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, कोणाचेही नाव न घेता त्यांनी केलेल्या या भाषणातून स्थानिक राजकारणातील दबावाच्या वातावरणावर भाष्य केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

या नागरी सत्कार सोहळ्यास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात स्वाभिमानी गणेश परिसर हा उल्लेख विशेष चर्चेचा विषय ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!