राहाता प्रतिनिधी
राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या वार्ता फलकाचे अनावरण राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यकर्त्यां सोबत संवाद साधताना म्हणाले की या वार्ताफलकाचे माध्यमातून शासनाच्या विविध योजना, स्थानिक घडामोडी आणि सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत
पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करा असे आवाहन त्यांनी केले केले पक्षाच्या कार्यपद्धतीचा माहितीचा प्रसार आणि प्रसार यासाठी तसेच संवाद या मूल्यांना बळकट करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यानिमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी चे राहाता मंडल अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, राहाता शहरातील स्थानिक घडामोडी या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाज प्रबोधनाच्या दृष्टीने असे फलक महत्त्वपूर्ण असतात
याप्रसंगी भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन कापसे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, ॲड. रघुनाथ बोठे, गणेशचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, वीरभद्र देवस्थान चे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, गणेशचे माजी संचालक मोहनराव सदाफळ, राहाता तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे साहेबराव निधाने, माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, सागर सदाफळ, अनिल बोठे, सुरेश गाडेकर, दशरथ तुपे, स्वप्नील बावके, बाळासाहेब सोनटक्के,सचिन मेहेत्रे,पांडू तुपे,गणेश सदाफळ, मिलिंद बनकर, दत्ता सदाफळ, प्रवीण सदाफळ, संजय भालेराव, हरी गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वार्ता फलकासाठी भारतीय जनता पार्टी चे राहता मंडल अध्यक्ष स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष संतोष सदाफळ, सरचिटणीस सचिन भैरवकर,चेतन गाडेकर कोषाध्यक्ष पंकज कुलकर्णी युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सागर कापसे, विजय सदाफळ, अतुल बोठे,किरण लांडगे, सचिन बोठे, नवनाथ मुजमुले चेतन रनमाळे, मनीष चितळकर, गणेश म्हसे, रवींद्र जाधव, वैभव करणोर आदींनी पुढाकार घेतला. यावेळी मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक करून मनःपूर्वक अभिनंदन केले.




















