*: राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी पाटील यांना राज्यस्तरीय ‘अर्थरत्न’ पुरस्कार जाहीर*
*देवळाली प्रवरा / राहाता -* सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेत इच्छापूर्ती प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय इच्छापूर्ती गौरव पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.
यावर्षीचा मानाचा *’अर्थरत्न पुरस्कार’* राहाता पीपल्स नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन *श्री. भाऊसाहेब माधवराव चौधरी पाटील, राहाता* यांना जाहीर झाला आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. संपत काका जाधव आणि सचिव हिंदूभूषण श्री. दत्ता पाटील गागरे यांनी अभिनंदन केले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा *दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता हॉटेल साईधन, शिर्डी* येथे आयोजित करण्यात आला आहे.



















