*राहात्यातील नामवंत बालाजी फरसाणचे विनोदसेठ लक्ष्मण बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन; अंत्यविधीस मोठी गर्दी*

*राहाता प्रतिनिधी*: राहाता शहरातील नामवंत *बालाजी फरसाणचे विनोदसेठ लक्ष्मण बाबर* यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते शंकरराव बाबर व संजय बाबर यांचे बंधु तसेच सनी बाबर यांचे वडील होते.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राहाता शहरावर शोककळा पसरली आहे. राहाता अमरधाम येथे झालेल्या त्यांच्या अंत्यविधीस व्यापारी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मृदू स्वभाव, मितभाषी व सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या विनोदसेठ यांच्या जाण्याने एक चांगला व्यापारी व समाजप्रिय व्यक्ती गमावल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.





















