Homeक्राईमयात्रेतील पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही म्हणून दशरथभाऊ तुपे नगरसेवक याना...

यात्रेतील पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही म्हणून दशरथभाऊ तुपे नगरसेवक याना जीवे मारण्याची धमकी

Screenshot

यात्रेतील पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही म्हणून नगरसेवक जीवे मारण्याची धमकी

राहाता (प्रतिनिधी) नगरपरिषदेचे नगरसेवक दशरथ अशोक तुपे यांना तुषार सदाफळ याने फोनवरून तसेच चौकात जमाव जमवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Screenshot

मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास राहाता शहरातील तुषार गणेश सदाफळ नावाच्या व्यक्तीने नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन केला. राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर तुमच्या मर्जीतल्या लोकांना देतात का ? आमच्या पोटावर पाय दिला असा जाब विचारत सदाफळ याने तुपे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

धमकीचे सत्र एवढ्यावरच थांबले नाही , तर रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुषार सदाफळ याने काही गुंड प्रवृत्तीची माणसे गोळा केली. तिथे जमा झालेल्या जमावाने नगरसेवक तुपे यांच्याबद्दल “याला आज जिवंत मारून टाका , याचा काटाच काढू” अशी प्रक्षोभक विधाने करून मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा केला.

Screenshot

तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, तुषार सदाफळ याच्याकडे बंदूक असून, तो या शस्त्राचा धाक दाखवून दशरथ तुपे यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष बाब म्हणजे, नगरसेवक दशरथ तुपे यांचा पाळण्याच्या टेंडर प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नसताना, केवळ राजकीय किंवा वैयक्तिक द्वेषातून हा प्रकार घडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नगरसेवक दशरथ तुपे यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.

घटनास्थळाजवळील (शिवाजी महाराज चौक) सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवावी.संबंधित व्यक्तीवर त्वरित कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.नगरसेवक दशरथ तुपे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे.

Screenshot

या घटनेमुळे राहता शहरात राजकीय वातावरण तापले असून, लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारे जाहीर धमकी दिली जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Screenshot

राहाता पो स्टे. मध्ये सदर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संस्था संहिता 189(2),191(2),190,352,351(2),30,37(1),37(37) आधी कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमावत मॅडम करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Jorge Messi: The man who made Messi: 5 unforgettable parenting lessons every Indian parent...

Today, August 8, 2026, the football world is mourning. Lionel Messi's father and longtime agent, Jorge Messi, died at the age of...

After online share fraud, ex-Army man fights frozen accounts battle

Proceeds from mule accounts can land even cybercrime victims in problem Pune: Any proceeds from mule accounts can land cyber fraud victims in...

AFA, Barcelona mourn death of Lionel Messi’s father Jorge Messi

Lionel Messi, Jorge Messi The Argentine Football Association (AFA) on Saturday offered its condolences to Lionel Messi and his family following the death...

Spain replaces its India ambassador after controversy over use of funds for cultural events:...

Spain pulls ambassador from India amid probe into concerts, €18K payment to singer, book events Spain's foreign ministry is replacing its ambassador to...

She saw textbooks being thrown away at 14. What this Delhi teenager did next...

Image credits: Vedika Jain At the end of a school year, textbooks often become yesterday’s material. They are pushed into cupboards, passed on...

error: Content is protected !!