*ब्रेकिंग न्यूज: MS SIGNATURE आंतरराष्ट्रीय पुरस्कारानंतर डॉ. संतोष मैड यांचा राहात्यात सत्कार!*

राहाता शहरासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! आपल्या शहरातील प्रसिद्ध स्त्री-रोग तज्ञ *डॉ. श्री. संतोष मैड सर* यांना नुकताच *MS SIGNATURE INTERNATIONAL AWARDS 2026, शिमला* येथे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राहात्यात जंगी सत्कार करण्यात आला.
हा सत्कार राहात्याचे प्रसिद्ध मूळव्याध तज्ञ *डॉ. किरण गोरे (साई अभिनव हॉस्पिटल, राहाता)* आणि *शिर्डी आवाज न्यूज LIVE चे संपादक पत्रकार राजुभाई पठाण* यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉ. मैड सरांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. डॉ. गोरे यांनी सांगितले की, “डॉ. मैड सरांनी ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात केलेले कार्य हे खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.”
डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे राहाता तालुक्यात गोरगरीब रुग्णांसाठी कमी खर्चात दर्जेदार उपचारासाठी ओळखले जाते.

*शिर्डी आवाज न्यूज व साई अभिनव हॉस्पिटल परिवाराकडून पुन्हा एकदा डॉ. संतोष मैड सरांचे हार्दिक अभिनंदन!*




















