Homeक्राईमनराधमाचा कळस अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, नग्न व्हिडीओ काढून ब्लॅकमेल

नराधमाचा कळस अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, नग्न व्हिडीओ काढून ब्लॅकमेल

नराधमाचा कळस
अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, नग्न व्हिडीओ काढून ब्लॅकमेल
शिर्डी / राहाता (प्रतिनिधी):
राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या एका नराधमाने शासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार करून तिचे नग्न फोटो व व्हिडीओ चित्रीकरण करत त्याच्या आधारे ब्लॅकमेल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात बलात्कार व ब्लॅकमेलिंगचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

राहाता शहर हादरले, संतापाची लाट
ही धक्कादायक घटना राहाता शहरात घडली असून, राजकीय आश्रयामुळे आरोपीचे धाडस वाढले असावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. आरोपीने विश्वासाचा गैरफायदा घेत महिलेला मानसिक, शारीरिक व सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विश्वासाचा गैरफायदा, धमकी अन् अत्याचार
फोटो–व्हिडीओ दाखवून वेळोवेळी बलात्कार
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज फकीरा कानकाटे (रा. राहाता) हा आई-वडील व लहान मुलासह एका इमारतीत भाड्याने राहत होता. पत्नीशी वाद असल्याने ती मागील तीन वर्षांपासून माहेरी राहत असून मुलाची जबाबदारी आरोपीकडे होती.
त्याच इमारतीत एका शासकीय संस्थेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे कुटुंब वास्तव्यास होते. आरोपीची पत्नी माहेरी असल्याने पीडित महिला तिच्या मुलाची चौकशी करण्यासाठी आरोपीच्या घरात ये-जा करत होती. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेला एकांतात पकडून तिचे फोटो काढले.
हे फोटो डिलीट करायचे असतील तर शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझ्या पतीला दाखवून “तुझे आणि माझे लफडे आहे” असे सांगेन, अशी धमकी देत आरोपीने वेळोवेळी बलात्कार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
अशा नराधमांना कठोर शिक्षा हवी – जनतेची मागणी
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून राहाता पोलीस ठाण्यात आरोपी मनोज फकीरा कानकाटे याच्याविरुद्ध बलात्कार व ब्लॅकमेलिंगचे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास राहाता पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे शिर्डी–राहाता परिसरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकीय आश्रयाखाली अशा विकृत प्रवृत्ती वाढत असतील तर प्रशासन व पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Screenshot
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुमच्याकडे उच्च भावनिक बुद्धिमत्ता असल्याची 10 सूक्ष्म चिन्हे

बरेच लोक प्रत्यक्षात ऐकत नाहीत; ते फक्त त्यांच्या बोलण्याची पाळी येण्याची प्रतीक्षा करतात किंवा लगेच "फिक्स-इट" मोडमध्ये जातात. उच्च-EQ व्यक्ती सक्रिय, सखोल ऐकण्याचा सराव...

2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी राज्यात 2.2 लाख पेक्षा जास्त प्रगणना ब्लॉक...

कोथरूडमधील जय भवानीनगर येथे जनगणना करताना पीएमसी कर्मचारी पुणे : राज्याने 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे - हाऊस लिस्टिंग आणि...

न्यूझीलंड महिला ८.१ षटकात ५३/२ | न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20...

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका महिला लाइव्ह स्कोअर, महिला T20 विश्वचषक 2026: महिला T20 विश्वचषकातील 7 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांसाठी त्यांच्या मोहिमेला कठीण...

'तेल आता वाहत आहे': डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की होर्मुझ पुन्हा उघडल्यानंतर अमेरिका 'लवकरच' रशियन...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी इराणशी झालेल्या करारानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर...

मधुर विरली: 'कडल नही करोगे क्या इसके बाद?' या जुन्या क्लिपनंतर कॉमेडियन मधुर विरलीने...

सुमारे दोन वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेली स्टँड-अप कॉमेडी क्लिप पुन्हा चर्चेत आली आहे आणि यावेळी, त्यावर हास्याऐवजी टीका होत आहे.अलीकडच्या काही दिवसांत, सोशल...

error: Content is protected !!