*डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत मूत्ररोग तपासणी शिबिर; 29 जून रोजी आयोजन*
*राहाता, दि. 1 मे*: शाकुंतल मेडिकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट संचालित *डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* यांच्या मार्फत *मोफत मूत्ररोग तपासणी शिबिर* आयोजित करण्यात आले आहे.
पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथीच्या समस्यांबाबत जागरूकता व मार्गदर्शन हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. अनेकदा प्रोस्टेट ग्रंथीच्या त्रासाची लक्षणे लक्षात न आल्यामुळे पुरुषांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्लक्ष केल्यास हा त्रास गंभीर स्वरूप धारण करून कर्करोगासारख्या आजारातही रूपांतरित होऊ शकतो.
*आजाराची प्रमुख लक्षणे:*
– *वारंवार लघवी होणे*: विशेषत: रात्री अनेक वेळा लघवीसाठी जावे लागणे
– *लघवी सुरू करण्यास अडचण येणे*: लघवी सुरू होण्यासाठी जास्त वेळ लागणे
– *लघवीचा प्रवाह मंद होणे*: लघवीचा वेग नेहमीपेक्षा कमी वाटणे
– *मूत्राशय पूर्ण रिकामे न झाल्यासारखे वाटणे*: लघवी झाल्यानंतरही लघवी शिल्लक असल्याची भावना होणे
– *लघवीचा प्रवाह मध्येच थांबणे*: लघवी मध्येच खंडित होणे व शेवटी थेंब-थेंब लघवी येणे
*शिबीर कालावधी:*
– *दिनांक*: सोमवार दि. 29 जून 2026 रोजी
– *वेळ*: सकाळी 10:00 ते दु. 2 पर्यंत
– *ठिकाण*: डॉ. मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, लोकरुची नगर, नगर-मनमाड रोड, राहाता, जि. अहिल्यानगर
मूत्ररोगासंबंधी समस्यांवर वेळेत उपचार व योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.
*संपर्क*: http://drmaidhospital.in | +91-7559243114





















