डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !
६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहाता शहरामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मोहनराव सदाफळ , मुकुंद नाना सदाफळ , ॲड . रघुनाथ बोठे , रिपाईचे पप्पू भाऊ बनसोडे , डॉ . स्वाधीन गाडेकर, प्रा .राजेंद्र निकाळे , डॉ . संजय उबाळे , धनंजय निकाळे, जयंतराव घोडेराव , माधवराव बिडवे , बाळासाहेब कोळगे , आबा आरणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . भिक्कु आणि संघ यांनी त्रिशरण पंचशील दिले .

यावेळी गणेशचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ , मोहनराव सदाफळ , ॲड . हुसळे , राजेंद्र वाबळे , मनोहर बोरुडे , ॲड. भाऊसाहेब सदाफळ , डॉ . संतोष मोकळ , डॉ . स्वाधीन गाडेकर , जयंतराव घोडेराव , प्रा. राजेंद्र निकाळे यांनी अभिवादनपर मनोगते व्यक्त केली .
या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर , सोसायटीचे माजी चेअरमन सुरेशराव गाडेकर , डॉ . संजय गायकवाड, डॉ . संजय उबाळे , समता परिषदेचे संतोष लोंढे , मुन्ना शहा , डॉ . विजय पुंडलिक सदाफळ , दत्तात्रय पद्माकर सदाफळ , रमेश गजानन निकाळे , प्रा . वसंत निकाळे , आबासाहेब बन्सी निकाळे, पंकज पिपाडा , पांडुरंग तुपे , गणेश निकाळे , विलास रामराव पाळंदे , बाळासाहेब भालेराव , ॲड . राजेंद्र पाळंदे ,सागर भालेराव , एकनाथ धिवर , बाबासाहेब पाळंदे , संदीप रामू सोनवणे , भाऊसाहेब दादा निकाळे , आनंदराव भारुड सर , केंद्रप्रमुख घेगडमल सर , बाळासाहेब बनसोडे , दिनकर निकाळे ,संतोष किसन बागुल , राहुल नानासाहेब निकाळे , काशिनाथ निकाळे , साई पाळंदे मान्यवरांसह महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे कार्यकर्ते रावसाहेब बनसोडे , अशोक पारखे आणि शेकडो आंबेडकरांच्या विचारांचे पाईक उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक भिमराज निकाळे , जितेंद्र दिवे , ज्ञानेश्वर तान्हाजी निकाळे, वीरेश लक्ष्मण सोनवणे , रावसाहेब निकाळे आणि अभिजीत निकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले .




















