
🩺 डॉक्टरच्या रूपातील एक देवमाणूस 🩺अर्थात डॉ. किरण गोरे
अनेक नॅशनल चॅनल व वर्तमान पत्रांसोबत काम केलेले जेष्ठ पत्रकार,समाजसेवक,आपल्या लेखणीतून धडकी भरवणारे ,नवराष्ट्र—नवभारत शिर्डी प्रतिनिधी सन्माननीय श्री राजेंद्र भुजबळ साहेब यांना पाच वर्षापूर्वी
पोटाचा अल्सर झाला, अनेक मोठ्या दवाखान्यात टेस्ट केल्या उपचारही घेतले मात्र तब्बेत खालावत गेली,शेवटी जगण्याची आशा मावळली मात्र एक दिवस डॉ किरण गोरे यांना भेटले ते म्हणाले राजाभाऊ तुम्हाला काहीच झालेलं नाही, असं म्हणून त्यांनी अनेक टेस्ट केल्या अर्थात त्यांनाच माहीत होत कि राजाभाऊंचा अल्सर मोठया प्रमाणात आहे. त्यांना ऍडमिट केलं मात्र आता त्यांच्या घरचे पत्नी आणि मुलं टेन्शनमध्ये आले कारण ते एक सर्वसाधारण पत्रकार,परिस्थिती जेमतेम आणि इतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी लागणारे पैसे त्यांच्या अक्षरशःपत्नीने दागिने गहाण ठेऊन केला होता, आता गोरे डॉक्टरांनी उपचार सुरु केले आणि त्याना एक नवीन जीवदान दिले हेच काय उपचार, शस्रक्रिया, औषधे हे सुद्धा त्यांनी मोफतच दिले. ते फक्त एकचं म्हणाले राजाभाऊ तुमच्या सारखे मित्र मला खूप कमी आहे तुमचे काम, इमानदारी आणि प्रामाणिकपणा मला खूप आवडतो आणि तुमचं स्मित हास्य हीच माझी फी आहे. हे ऐकताना राजा भाऊंची पत्नी, मुलगा भावुक झाले, कळत नकळत त्यांच्या ही डोळ्यात अश्रू आले पण ते न दाखवता देवाला एकच म्हणाले कि, देवा मी तुला पाहिलं नाही परंतु एका डॉक्टरच्या रूपात तू नक्कीच नक्कीच दिसला.आणि मी आता ठणठणीत बरा झालो.
आता पुन्हा संघर्षमय जीवन जगत असताना एक महिन्यांपासून त्यांच्या पाठीला गाठ आली आणि त्या वेदना ते अंगावर काढत होते त्रास खूप वाढला म्हणून डॉ किरण गोरे यांना सांगितलं, आज त्यांनी तपासणी केली आणि लगेच ऑपरेशनचा निर्णय घेतला, ऑपरेशन थेटरमध्ये, स्वतः डॉक्टर, ब्रदर, सिस्टर हे जणू मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य असं समजून हसत खेळत अर्धा तासात त्यांच्या पाठीच्या ट्यूमरचं ऑपरेशन केलं.एक तास बेडवर अराम केला डॉक्टरांनी कॉफी, भिस्कीट खायला दिले आणि राजा भाऊना डिस्चार्ज दिला. पंधरा दिवसांनी टाके काढायला बोलावलं. आणि जाताना राजेंद्र भुजबळ साहेब म्हणाले की सर फी किती झाली? डॉक्टर हसत म्हणाले राजूभाऊ बाबांच्या कृपेने मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुमचं प्रेम हीच माझी फी आहे. अर्थात पुन्हा डॉ किरण गोरे या देवमाणसाने राजा भाऊना धीर देऊन एका नवीन संकटातून बाहेर काढलं.
डॉ गोरे हे जिह्यात नव्हे तर राज्यात आणि देशात प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे अपेंडिस, हर्निया, अल्सर, पित्तशयाची थैली, आताड्यांच्या विविध शस्रक्रिया, मुतखडा, किडनीच्या शस्रक्रिया, मूळव्याध, फिशर या सर्वं आजरांचे परफेक्ट उपचार त्यांच्या साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, राहाता येथे केले जातात.
डॉ.किरण गोरे यांचा मोबाईल नं. 9226118118
9405000454
पत्रकार राजेंद्र भुजबळ
नवराष्ट्र – नवभारत, शिर्डी
8888777711




















