राहाता तालुक्यात नगरसेवक या नावास सर्वोत्कृष्ट व योग्य असे सन्माननीय श्री दशरथभाऊ तुपे हे आमचे पारिवारिक मित्र व स्नेही असल्याचा मला व माझ्या परिवारास सार्थ अभिमान आहे.त्यांच्या जनसामान्यांच्या सोबत असलेले मैत्रीरूपी सामाजिक जिव्हाळ्याचे निःस्वार्थी कार्यामुळे सर्वांना परिचित आहेत.माझ्या सलमानचा वाढदिवस पण आमचा सर्व परिवार काही अपरिहार्य कारणाने बाहेर गावी होतो.सलमान एकटा आमच्या दुकानावर होता.अचानक श्री दशरथ भाऊ तुपे,त्यांच्या अर्धांगिनी सौ अनुराधा तुपे व मुलगा श्री दुकानावर हजर झाले.सलमानसाठी केक,शाल,बुके सर्व काही सोबत घेऊन आले होते.विशेष म्हणजे स्पेशल फेटा आणला होता तो त्यांच्या वैशिष्ट पूर्ण हातोटीने बांधून सलमानभाई चा सत्कार करून त्याला सन्मानित केले आणि शुभेच्छा देवून लाखमोलाचा आशीर्वाद दिला.
आम्ही कोणीही हजर नसताना इतक्या चांगल्या प्रकारे सलमानभाई चा बर्थडे साजरा केला त्याबद्दल सलमानच काय आमच्या सर्व परिवाराने त्यांचे कौतुक करून आभार मानले.

कौटुंबिक जिव्हाळ्याचे मैत्रीरूपी असलेल्या थोड्याश्या कुटुंबापैकी सर्वात वरचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे——श्री दशरथभाऊ तुपे व सौ अनुराधा तुपे यांचे श्रेष्ठ कुटुंब होय.म्हणुनच प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवून त्याची जानिव असनारा खरा मानुस म्हणजे दशरथभाऊ तुपे.





















